July 16, 2025
Cloudy sky with rain showers over a green rural landscape – representing weather forecast by Manikrao Khule.
Home » पुढील ४ दिवस मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता
गप्पा-टप्पा शेती पर्यावरण ग्रामीण विकास

पुढील ४ दिवस मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.

माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.

प्रश्न -पुढील ४ दिवसात पावसाचा जोर अधिक कोठे असेल ?

माणिकराव खुळे – गुरुवार दि.२२ ते रविवार दि. २५ मे पर्यंतच्या चार दिवसात मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी ह्या ठिकाणी दुपारनंतर मध्यम ते जोरदार अवकाळी पावसाची शक्यता जाणवते.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी ह्या जिल्ह्यात तर ह्या जोरदार पावसाचा प्रभाव सोमवार दि. २६ मे पर्यन्त ही राहू शकतो. ह्या कालावधीत विदर्भात मात्र तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाचीच शक्यता जाणवते.

प्रश्न – ह्या ३ दिवसातील पावसाचा जोर कश्यामुळे ?

माणिकराव खुळे – अरबी समुद्रात कर्नाटक किनारपट्टी समोर तयार झालेल्या हवेच्या कमी दाब क्षेत्रातून, आवर्ती चक्रीय वाऱ्यांची निर्मिती व त्याचे उत्तरेकडे होणारे मार्गक्रमण ह्यातून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. 

प्रश्न – महाराष्ट्रात अवकाळीचे हे वातावरण कधी पर्यन्त असेल?

माणिकराव खुळे – एकंदरीत जरी शनिवार दि. ३१ मे पर्यन्त पावसाचे वातावरण असले तरी गुरुवार दि. २९ मे पासून महाराष्ट्रात अवकाळीचे वातावरण काहीसे निवळण्याची शक्यता जाणवते. अर्थात मान्सूचे केरळातील आगमनाची तारीखच  ह्याची दिशा ठरवेल.

प्रश्न – अवकाळी पावसाच्या ओलीवर आगाप पेरणीसाठी धाडस करावे काय?

माणिकराव खुळे – अवकाळी पावसाची स्थिती सध्या जरी चांगली वाटत असली तरी, प्रत्यक्षात मान्सून चे महाराष्ट्रात आगमन केंव्हा होते आणि आगमनानंतर त्याच्या वितरणाची स्थिती व मान्सून च्या पावसावर मिळालेल्या ओलीची खोली ह्यावर हे ठरवता येईल. त्यामुळे महाराष्ट्रात ह्या पावसामुळे केवळ पेरणीपूर्व शेतीच्या मशागतीचाच विचार व्हावा, असे वाटते. परंतु कपाशी व टोमॅटो लागवडी करु इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी, एखाद्या-दोन सिंचनाच्या पाण्याची व्यवस्था असेल तरच लागवडीचा विचार करावा, असे वाटते.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading