ओळख औषधी वनस्पतींची यामध्ये बेहडा या वनस्पतीबद्दल माहिती…
– सतिश कानवडे
संस्थापक,
औषधी वनस्पती व आरोग्य पर्यटन केंद्र,
सावरचोळ, ता. संगमनेर, जि. नगर
मोबाईल 9850139011, 9834884804
वनस्पतीचे नाव- बेहडा
ही वनस्पती कॅंम्बेटसी कुळातील असून ती प्रामुख्याने कोकणात आढळते. हा उंच पानझडी वृक्ष आहे. सालीला निळसर छटा असून उभट चिरा असतात. खोड १० ते १५ मीटर सरळ वाढते. पाने हिरवीगार आणि अर्धवर्तुळाकार असतात. फुले हिरवट आणि उग्र वासाची असतात.
औषधी उपयोग-
रक्ताची कमतरता आणि ल्युकोडर्मा यासाठी सालीचा उपयोग होतो. फळे चवीला तुरट असून पाचक, सारक, कृमिनाशक असून घशाची जळजळ ब्रोकायटीस, दमा, नेत्रविकार, हृदय, नाक, मूत्राशय आदीवर होणाऱ्या विकारावर गुणकारी आहे. बेहड्याचे फळ त्रिफळा चुर्नातील एक घटक आहे. बियाचे तेल केशवर्धक असून संधिवातावर गुणकारी आहे. फळाचा वापर इतर औषधाबरोबर सर्पदंश व विंचू दंशावर केला जातो. याचा उपयोग सर्दी, तहान, दात, कफ आदी विकारांवर केला जातो.
हवामान व जमीन-
हा वृक्ष भारत, म्यानमार, श्रीलंका या देशामध्ये आढळतो. जंगल हवामानातील समुद्र सपाटीपासून १००० मीटर उंचीपर्यंत हा वृक्ष आढळतो. महाराष्ट्रातील विशेषतः कोकणामध्ये हा वृक्ष आढळतो. डोंगर उतारावर आणि नदी नाल्याच्या न्क्देला याची वाढ चांगली होते.
लागवड –
या झाडाची लागवड बी पेरून/ नर्सरीमध्ये रोप तयार करून करावी. बिया २४ तास पाण्यात ठेवून त्यानंतर त्याचा पेरणीसाठी वापर करावा.
मशागत-
गवत काढणे, वेळोवेळी पुरेसे पाणी देणे, पहिले ४/५ वर्षे सोय/ चवली असे आंतरपीक घ्यावे. म्हणजे मशागतीचा खर्च मिळू शकतो.
काढणी-
लागवडीनंतर ७/८ वर्षांनी फळे लागण्यास सुरुवात होते. झाडाचे आयुष्य ३०/४५ वर्षे असते. चांगली वाढलेली निरोगी फळे गोळा करून सुकवावीत. फळांच्या बियांवरील मांसल भाग औषधी असल्याने त्याची भुकटी करावी.
उत्पादन/बाजारभाव-
एका झाडापासून ४० ते ५० किलो फळे मिळतात. एक किंवा दोन रुपये किलो भाव असला तरी मागणी मोठी आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
1 comment
झाडांची माहिती उत्तम. अशीच सर्व झाडांची माहिती टाका.