‘मसाप’च्या पिंपरी-चिंचवड शाखेचे साहित्य पुरस्कार प्रदान
पिंपरी : ‘लिखाणात ताकद असावी लागते, उत्कंठा असावी लागते. यासाठी लेखकाला साधना करणे गरजेचे असते. पुरस्कार हे सफल साधनेचे दुसरे रूप होय,’ असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचा वितरण सोहळा पार पडला, यावेळी ते बोलत होते.
यावेळी कादंबरी, कथा, ललित, कविता, बालसाहित्य या पाच विभागांमध्ये १८ पुस्तकांच्या लेखकांना उत्कृष्ट, लक्षवेधी व उल्लेखनीय अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून २४० पुस्तके प्राप्त झाली होती.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निगडीतील शांता शेळके सभागृह येथे झालेल्या या सोहळ्यास माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी- चिंचवडचे अध्यक्ष राजन लाखे, कार्याध्यक्षा विनिता ऐनापुरे, डॉ. रजनी शेठ, रवींद्र पाटील, विवेक मोहिले, रजनी दुवेदी, संभाजी बारणे, नंदकुमार मुरडे आदी उपस्थित होते. राजन लाखे यांनी प्रास्ताविकातून पुरस्काराची पार्श्वभूमी मांडली.
या वेळी डॉ. राजश्री पाटील, कृष्णकांत चेके, नितीन सुतार, दीपक तांबोळी, जयश्री देशकुळकर्णी, लक्ष्मण दिवटे, सुजाता राऊत, बालाजी इंगळे, डॉ. सुनंदा शेळके, देवेंद्र जोशी, निरुपमा महाजन, डॉ. राजेंद्र झुंजारारव, मानसी चिटणीस, डॉ. सुरेश सावंत, संजीवनी बोकील, सविता करंजकर, गणेश भाकरे, प्रमोद नारायणे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. संजय जगताप व किरण लाखे यांनी सूत्रसंचालन केले. विनिता ऐनापुरे यांनी आभार मानले.
संजय जगताप व किरण लाखे यांनी सूत्रसंचालन केले. विनिता ऐनापुरे यांनी आभार मानले. जयश्री श्रीखंडे, किरण जोशी, नागेश गव्हाड, श्रीकांत जोशी यांनी संयोजन केले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.