ओवा आपल्या परसबागेत का लावावा. त्याचे अनेक फायदे आहेत. काही आजारावर घरगुती उपायही उपयुक्त ठरतात. नैसर्गिक उपायांनी आपले शरीर उत्तम राखता येते. यासाठी त्याचे फायदे जाणून घेऊन त्याचा शास्त्रोक्त पद्धतीने उपयोगही जाणून घेणे तितकेच गरजेचे आहे.
डॉ. मानसी पाटील
१. शरीर डिटॉक्स होते –
ओव्याची पानं हे एक उत्तम नैसर्गिक डिटॉक्स आहे. या पानांचा काढा शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्यामुळे थोडी ओव्याची व तुळशीची पानं एकत्र करुन त्याचा काढा तयार करावा. त्यानंतर त्यात २-३ थेंब लिंबाचा रस मिक्स करावा व हा काढा घ्यावा. त्यामुळे शरीर डिटॉक्स होण्यासोबतच शरीराचं हायड्रेशन देखील होते. तसेच शरीराची रोग प्रतिकार क्षमता वाढते.
२. पोटदुखी दूर होते –
साधारणपणे कधीही आपलं पोट दुखू लागलं की आपण ओवा खातो. त्याचप्रमाणे जर तुमच्या घरी ओव्याचं झाड असेल तर ओव्याऐवजी त्याची पानं खा. या पानांमुळे पोटदुखी दूर होण्यासोबतच जठर व आतड्याची ( गॅस्ट्रोइंटेस्टइनची ) समस्यादेखील बरी होते.
३. पचनक्रिया सुधारते –
आपलं अन्नपचन जर नीट झालं नाही तर अनेक शारीरिक समस्या डोकं वर काढतात. यात पोटदुखी, अॅसिडिटी, जळजळ, पित्त होणे अशा समस्या हमखास होतात. त्यामुळे दिवसातून एकदा तरी ओव्याचं कोवळं पान खावं. त्यामुळे पचनक्रिया सुधारते व भूक देखील वाढते.
४. तोंडाची दूर्गंधी दूर होते –
दिवसभर आपण अनेक वेगवेगळे पदार्थ खात असतो. त्यामुळे सहाजिकच हे अन्न कण दातांमध्ये अडकून तोंडाला दुर्गंधी येते. म्हणूनच ही दुर्गंधी दूर करायची असेल तर दररोज जेवण झाल्यावर ओव्याचं पान खावं.
५. सर्दी-खोकला बरा होतो –
सर्दी किंवा खोकला झाल्यास ओव्याची ७-८ पानं घेऊन ते एक ग्लास पाण्यात उकळावीत. त्यानंतर हे पाणी अर्धा ग्लास होईल इतकं आटवावं. त्यानंतर हे पाणी गार झाल्यावर गाळून त्यात मध टाकून प्यावं.
६, सुंदर त्वचेसाठी –
रोज काही ओव्याची पाने आणि आले अर्धा इंच याचा रस डाळिंबाच्या रसात मिसळून पिला तर त्वचा व केस सुंदर आणि मुलायम होतील.
डॉ. मानसी पाटील
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.