December 14, 2024
Seema Mangrule Tavate poem on Ringan in Palkhi Sohala
Home » रिंगण
कविता

रिंगण

रिंगण

चालती वारकरी
वाट पंढरीची
घरदार सोडती
मनी आस भेटीची….

मिळे भक्तगणा प्रसाद
देते जन सारे
पुण्य पदरी पडे
चित्र दिसे न्यारे….

कधी घालूनी रिंगण
पाहे सोहळा डोळा भरून
येई घोडा उधळत
जाई पारणे फिटून….

पहावया भक्तीचा देखावा
भक्तगण लाखोंनी येतात
भक्तीरसात दंग होऊनी
टाळ,मृदुंगात दंग होतात…

दर्शन घेता विठूरायाचे
धन्य,धन्य होई जीवन
आता नको काही देवा
झालो आम्ही पावन…

सीमा मंगरूळे तवटे, वडूज


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading