दूधी( दुग्धिका, नागार्जुनी, नायटी):
रस्त्याच्या कडेला, कुंपणाजवळ, पडीक जागेत, पडलेल्या वाड्यांमध्ये आढळते. या वनस्पतीला जवळजवळ कचरा समजतात परंतू ही औषधी वनस्पती आहे. यामध्ये लहान आणि मोठी असे दोन प्रकार पण गुणकर्म सारखेच असतात.
डॉ. मानसी पाटील
निसर्गात अनेक अशा वनस्पती आहेत ज्या आपल्या सभोवताली भरपूर प्रमाणात असतात परंतू ओळख आणि औषधी गुणधर्म माहिती नसल्यामुळे त्या वनस्पतींचा उपयोग आपण करत नाही. दूधी त्यातीलच एक वनस्पती. ही रस्त्याच्या कडेला, कुंपणाजवळ, पडीक जागेत, पडलेल्या वाड्यांमध्ये आढळते. या वनस्पतीला जवळजवळ कचरा समजतात परंतू ही औषधी वनस्पती आहे. यामध्ये लहान आणि मोठी असे दोन प्रकार पण गुणकर्म सारखेच असतात. दूधी पसरट वाढते.अनेक उपशाखा असतात. याची फांदी किंवा पान तोडले असता दुधासारखा द्रव निघतो. फुले हिरवे किंवा पिवळ्या रंगांची असतात.
दूधी मध्ये कफपित्तनाशक, वातवर्धक, उत्तेजक, रक्तशोधक,कफघ्न, अश्मरीघ्न, कुष्ठघ्न, विषघ्न इ.गुणधर्म असतात.
दूधीचे औषधी उपयोग:-
- रातआंधळेपणावर दूधीचे दूधाने अंजन करावे. यामुळे थोडावेळ आग होते परंतू काही वेळाने आग कमी होऊन रातआंधळेपणावर चांगला गुण येतो.
- पोट बिघडलं किंवा अतिसार झाल्यास याची पाने चावून खावीत.
- केस गळत असतील, अकाली पांढरे झाले असतील तेव्हा दूधीचे दूध बकरीच्या दूधात एकत्र करून केसांच्या मुळांना हळवारपणे लावल्याने पंधरा ते वीस दिवसांत गुण येतो.
- मातेला दूध कमी झाल्यास दूधीचे दूध पंधरा थेंबापर्यंत सकाळ-संध्या. वीस दिवस द्यावे.
- दमारोगात दूधीचे पंचांगाचा काढा किंवा रस मधातून द्यावा.
- मधूमेहात गुडमार, दूधी आणि जांभूळ बीज समप्रमाणात एकत्र एक ग्रॅम वजनापर्यंत सकाळ – संध्या पाण्यातून द्यावी.
- पुरूषांमध्ये शारीरीक कमजोरीत दूधी मुळासहित उपटून सावलीत वाळवून चूर्ण करुन एक ते दोन ग्रॅम खडीसाखरेतून सकाळ – संध्या जेवणानंतर घ्यावे.
- पायात काटा रुतल्यास दूधीचे दूध लावावे याने काटा लवकर बाहेर येतो.
- सर्पविषावर दूधीचे पंधरा पाने आणि काळी मिरी पाच एकत्र करुन खाण्यास द्यावी.
- विंचू चावल्यावर..जिथे दंश झाला त्या ठिकाणी याच्या चिकाचे दोन थेंब टाकावेत.
- त्वचारोगात मोहरीतेल, तीळतेल, करंजतेल आणि दूधी एकत्र करुन लावल्यास दाद, खाज, खुजली हे रोग बरे होतात.
- महिलांनी श्वेतप्रदररोगात दूधीचे दोन पाने मधातून सेवन करावे.किंवा दूधीची मुळी दोन ग्रॅम पाण्यात वाटून दिवसातून दोनदा दिल्यास श्वेतप्रदर आणि रक्तप्रदर बरे होतात.
- तोतरे बोलण्याची किंवा अडकत बोलण्याची सवय असल्यास दूधीची मुळी दोन ग्रॅम विड्याच्या पानात घालून पान चावून रस गिळत जावा.
महत्त्वाचे – दूधीचे सेवन पंधरा दिवसांपर्यंतच करावे. दूधीचे अतिसेवन हृदयासाठी हानीकारक असते. औषधी वनस्पतींचे सेवन करण्याच्या अगोदर तज्ञांचा सल्ला घ्यावा.
डॉ. मानसी पाटील
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.