May 26, 2024
mind-control-tips-article-by-pushpa-varkhedkar
Home » मन हा मोगरा !
मुक्त संवाद

मन हा मोगरा !

दोन मन असतात एक बहिर्मन व दुसरे अंतर्मन; पण हे कधीच खोटे बोलू शकत नाही ते आपल्याला चांगल्या मार्गावर नेण्याचा वारंवार सूचना देत असतात.

सौ पुष्पा सुनीलराव वरखेडकर,
पीडी कन्या शाळा, वरुड

मन हा मोगरा !
मन हा मोगरा ! अर्पुनी ईश्वरा !
पुनरुपी संसारा येणे नाही !

मनाचे माहात्म्य एवढे थोर आहे. मन हे अतिशय चंचल आहे. अर्जुनाने श्रीकृष्णाला प्रश्न केला की ईश्वराची उपासना करण्याकरता एकाग्रचित्त आवश्यक आहे, परंतु ते अतिशय चंचल असल्यामुळे त्याला वश करता येत नाही.

श्रीकृष्णाने त्याला सततच्या अभ्यासाने ताब्यात घेता येते असा विचार सांगितला. मनावर बुद्धीचे नियंत्रण हवे, म्हणजेच इंद्रिय संयमीत केली की मनावर ताबा मिळवता येतो. मन हे फुलपाखरासारखे आहे. त्याला भटकू देऊ नये empty mind is devil’s workshop त्याला कुठल्याही प्रकारचा छंद जोपासावा लागतो.

ज्याप्रमाणे पाणी जिकडे नेईल तिकडे जाते त्याप्रमाणे त्याला योग्य ठिकाणी वळवता येते; मनरूपी रथावर बसून श्रवणाद्वारे बाहेर निघून शब्दरूपी रानात संचार करते, तो प्रकृतीचा लगाम हातात धरून त्वचेच्याद्वारे स्पर्श रुपी घोर वनात जातो. एखाद्या वेळेस नेत्राच्या द्वारे बाहेर पडून रूप विषयाच्या डोंगरावर स्वच्छंदाने हिंडतो किंवा जिभेच्या द्वाराने बाहेर पडून रसाच्या गुहेत किंवा जीवनाच्या द्वाराने बाहेर पडून सुगंधाच्या करण्यात फिरतो. याप्रमाणे देह व इंद्रिय यांचा नायक जे मन ते धरून पंचेंद्रियाचे विषय जे शब्दादिक यांचा उपभोग घेतो असा मनाचा व इंद्रियाचा निकटचा संबंध आहे, असे माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात.

गीतेमध्ये कृष्णाच्या सारथी रूपात मनाला उपमा दिली आहे आणि त्याला जोडलेले दहा घोडे म्हणजे इंद्रिय आणि या दहा इंद्रियावर निग्रह ठेवणे आवश्यक आहे मन हे आपल्या शरीराचा अमृत कलश आहे जीवनात मनाशी कधीही हारू नये.

मन के हारे हार है ! नक्की जीते जीत ! आपल्याजवळ मानसिक शक्ती असेल तर असफलतेवर आपण मात करू शकतो. वैज्ञानिकांनी हृदयाला शोधून काढलं पण मन शोधता आलं नाही; मानव मनुष्य व मानवता हे सर्व मनामुळेच आहे आपल्याला मनाचे महत्त्व मानवी जीवनात अतिशय महत्त्वाचे आहे, म्हणून मनाला खतपाणी घालण्याकरता वारंवार सत ग्रंथाचे वाचन, चरित्राचे वाचन, श्रवण मनन हे करणे आवश्यक आहे.

मनाची शक्ती एवढी भरभक्कम आहे की मन हे जर परमेश्वराला समर्पित केले तर या संसार चक्रातून माणसाची सुटका होते व मनुष्य ईश्वर सुद्धा बनू शकतो. एवढी शक्ती मनाची आहे, पण या सर्व गोष्टीला सततचा अभ्यास आवश्यक आहे.

Related posts

300 एकर जमीन क्षारपडमुक्त करण्याचा मानस

अर्ध सैनिक दलातील संधी…

स्त्री जन्मा तुझी कहाणी! हृदयी अमृत नयनी पाणी!

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406