मोशी : साहित्यिक, कलाकार, रसिक आणि वाचक यांच्यासाठी विविध स्तरांवरील चर्चा, मुलाखती, पुस्तके यांची मेजवानी ठरणारे असे मोशीतील जय गणेश बँक्वेट हॉल येथे मोशी ग्रामस्थ व इंद्रायणी साहित्य परिषदेच्यावतीने इंद्रायणी साहित्य संमेलनाचे शनिवार (ता.२४) आयोजन करण्यात आले. अशी माहिती संमेलनाध्यक्ष अरुण बोऱ्हाडे व स्वागताध्यक्ष संतोष बारणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या निमित्ताने मोशी ग्रामदैवत श्री नागेश्वर महाराज मंदिर ते संमेलन स्थळ असे ग्रंथ दिंडीचे आयोजन केले असून पूजन बाळासाहेब काशीद, विशाल सोनी, सीईओ, विश्वकर्मा पब्लिकेशन्स होत आहे. स्वागताध्यक्ष संतोष सिताराम बारणे यांच्या मातापित्यांची ग्रंथतुला करण्यात येणार असून यामध्ये ग्रंथ उपस्थित शाळांना देण्यात येणार आहेत.
अ. भा. मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते ”अजून पहाट झालीच नाही.” हे लेखक दादाभाऊ गावडे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, आमदार महेश लांडगे, दिलीप मोहिते पाटील, म.सा.प. पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष राजन लाखे, प्राचार्य मा. पांडुरंग गाडीलकर हे उपस्थित राहणार आहेत.
संमेलनाध्यक्ष अरुण बोऱ्हाडे, स्वागताध्यक्ष संतोष बारणे यांच्या उपस्थितीत या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.
दिवसभरामध्ये एकूण सात सत्र असून यामध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त परिसंवाद – राष्ट्रउभारणीत शिक्षकांचे योगदान अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, सहभाग – विविध शाळा, महाविद्यालयांतील अध्यापक व प्राध्यापक प्रमुख उपस्थिती राजमाता शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अजित गव्हाणे, पुस्तक प्रकाशन अक्षरप्रतिमेतील प्रज्ञावंत (लेखक- अरुण बोऱ्हाडे संवेदना प्रकाशन, पुणे) प्रकट मुलाखत, साहित्य रसिक उल्हास पवार, साहित्य कलाप्रेमी, माजी महापौर संजोग वाघेरे पाटील शब्द संवादक नाना शिवले, निमंत्रितांचे कविसंमेलन अध्यक्ष प्रा. तुकाराम पाटील प्रमुख उपस्थिती ज्येष्ठ साहित्यिक राज अहेरराव, माजी महापौर राहुल जाधव, सूत्र संचालन कवी प्रदीप गांधलीकर
”श्रमसंस्कृती आणि शब्दसंस्कृतीचा मिलाफ : संमेलनाध्यक्ष अरुण बोऱ्हाडे यांची मुलाखत प्रमुख उपस्थिती ज्येष्ठ साहित्यिक शिवाजीराव चाळक, माजी महापौर नितीन काळजे, शब्द संवादक साहित्यिक संतोष घुले.
समारोप सत्र प्रज्ञावंत पुरस्कार व भूमिपुत्र पुरस्कार वितरण : मा. भारत सासणे यांच्या हस्ते, ज्येष्ठ साहित्यिक, ९५ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन उदगीर अध्यक्ष भारत सासणे पुस्तक प्रकाशन राष्ट्रभक्तांची स्मरणगाथा, लेखक- अरुण बोऱ्हाडे विशेष उपस्थिती ”पानिपत”कार विश्वास पाटील, प्रमुख पाहूणे आमदार आण्णा बनसोडे सूत्रसंवादक श्रीकांत चौगुले “इंद्रायणी साहित्य परिषद” नामफलक उद्घाटन ”पानिपत”कार विश्वास पाटील यांची प्रकट मुलाखत शब्द संवादक इतिहास संशोधक संदीप तापकीर इतिहास, अध्यक्ष सोपानराव खुडे, ज्येष्ठ साहित्यिक, प्रमुख उपस्थिती पिंपरी चिंचवड साहित्य मंचचे राजेंद्र घावटे, पिंपरी चिंचवड व्याख्यानमाला समन्वय समितीचे सुहास पोफळे आदी कार्यक्रम होणार असल्याची माहिती संमेलनाध्यक्ष व स्वागताध्यक्ष यांनी दिली.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.