- विजय चोरमारे संमेलनाध्यक्ष ;
- उद्घाटक डॉ. बाबासाहेब देशमुख ;
- विठ्ठल साळुंखे स्वागताध्यक्ष
विटा : बलवडी भा. ( ता. खानापूर ) येथील जोर्तिलिंग साहित्य सेवा मंडळाच्यावतीने रविवारी ( ता. २५ ) ३० वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन आयोजित केले आहे. पत्रकार विजय चोरमारे संमेलनाध्यक्ष आहेत. पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे, अशी माहिती संयोजक अॅड. सतीश लोखंडे यांनी दिली.
संमेलन तीन सत्रात होणार आहे. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे ( पुणे ) विचार मंचावर संमेलन होईल. पहिले सत्र सकाळी दहा वाजता सुरू होईल. जेष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे नातू पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बाॅडीचे सदस्य डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. पत्रकार व साहित्यिक विजय चोरमारे यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन होणार आहे.
शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्थेचे कार्यकारी संचालक विठ्ठल साळुंखे स्वागताध्यक्ष आहेत. ऊसकोंडी कांदबरीचे लेखक डॉ. श्रीकांत पाटील ( घुणकी ) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
यावेळी शाहिर बाळकृष्ण कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जोर्तिलिंग वाड:मय पुरस्काराने शाहिर बजरंग आंबी, डॉ. एच. के. पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आदर्श शेतकरी पुरस्कार मानसिंग जाधव ( जाधवनगर ) , श्रीमती इंदूमती आनंदराव पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शारदा नानासाहेब साळुंखे यांना आदर्श माता पुरस्कार, मारुती मलू जाधव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आदर्श प्राथमिक शिक्षक पुरस्कार ऋषिकेश तांबडे ( कार्वे ), भि. रा. पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आदर्श माध्यमिक शिक्षक पुरस्कार सिकंदर मोमीन ( भाळवणी ), सदानंद कदम ( सांगली ), रमजान मुल्ला ( नागठाणे ) विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
भारतीय संविधान आणि ग्रामीण साहित्य याविषयावर परिसंवाद आयोजित केला आहे. डॉ. सुभाष वाघमारे ( सातारा ) अध्यक्ष आहेत. विजय मांडके ( सातारा ) वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.
दुसऱ्या सत्रात जयवंत आवटे ( कुंडल ) यांचे कथाकथन होईल. तिसऱ्या सत्रात कवी इंद्रजीत घुले ( मंगळवेढा ) यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होणार आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.