मिरज येथे दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, शब्दांगण साहित्यिक व सांस्कृतिक व्यासपीठ व मिरज हायस्कूलच्यावतीने नामदेव चैतन्य साहित्य संमेलन भरवण्यात येते. यामध्ये नामदेव चैतन्य साहित्य पुरस्कार विविध साहित्य कृतींना देण्यात येतात. यंदा हे संमेलन रविवारी (१३ ऑगस्ट) मिरज हायस्कूलच्या सांस्कृतिक हॉलमध्ये होणार असून सकाळी ९ वाजता महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. यामध्ये साहित्य पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
जाहीर साहित्य पुरस्कार असे –
नामदेव भोसले स्मृती साहित्य सेवा पुरस्कार – विजय जाधव ज्येष्ठ साहित्यिक, बुरुंगवाडी.
नामदेव भोसले स्मृती सामाजिक सेवा पुरस्कार – डॉ. शिरीष चव्हाण मिरज.
नामदेव भोसले स्मृती ग्रामीण वाचनालय पुरस्कार – कर्मवीर भाऊराव पाटील वाचनालय, इ. धामणी
कै. चैतन्य माने, कै. विवेक माने, स्मृती साहित्य पुरस्कार असे –
श्री. प्रणव माने यांच्याकडून
चैतन्य माने स्मृती साहित्य पुरस्कार – ‘झांजडझगडा’ – विक्रम राजवर्धन
विवेक माने स्मृती साहित्य पुरस्कार – ‘बारा गावचं संचित’ – जयवंत आवटे
कै. प्रकाश कोरे, कै. अशोक कोरे, स्मृती साहित्य पुरस्कार-
उद्योगपती बाबुराव कोरे (शिव ऑफसेट) यांच्याकडून
प्रकाश कोरे स्मृती साहित्य पुरस्कार – ‘सांजात’ प्रताप वाघमारे
अशोक कोरे स्मृती साहित्य पुरस्कार – ‘प्रेमफुलांची ओंजळ’ प्रा. अनिलकुमार पाटील, हिंगणगाव
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.