March 23, 2023
Fulbaja by Rajan Konawadekar
Home » आपटबार…
व्हायरल

आपटबार…

गेल्या काही महिन्यात राजकारणात अनेक आपटबार फुटत आहेत. त्यातच अनेक उलाथपालथी होत आहेत. याचा परिणाम सर्वसामान्यावर तर होतोच मग त्यामुळे अशा राजकारणाला ताळ्यावर आणण्यासाठी राजन कोनवडेकर यांचा फुलबाज्या तर ठिणग्या टाकणारच ना…

खोड…..

उचलली जीभ लावली टाळ्याला
वाटेल तसे भकत असतात |
गावठी कुत्री अल्शिशियन समजून
मालकासाठी भूकत असतात ||

राजन कोनवडेकर

आपटबार….

डोकी वरती किरीट मस्तवाल
घालून मिरवती जळलेले |
वाटेल तसे भकतात पोपट
राजकारणात पाळलेले ||

राजन कोनवडेकर

उमाळा..

शेतकरी हिताला प्राधान्य
प्रधान मंत्र्यांचा गजर |
आंदोलन कर्त्यांच्या नशिबात
वांज गाईचा पाझर…||

राजन कोनवडेकर

अघोरी प्यास….

जालीयनवाल्या बागातल्या
आणि लखीमपूरी रागातल्या
सारख्याच होत्या किंकाळ्या |
फरक इतकाच होता
यांनी चालवल्या मोटारगाड्या
त्यांनी घातल्या गोळ्या |

राजन कोनवडेकर

Related posts

थोडं हसूया !

मळमळ

मुलगी पाहण्याचा कार्यक्रम…

Leave a Comment