सह्याद्री साहित्य मंच पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन
सह्याद्री साहित्य मंच, ता. गगन बावडा, जि.कोल्हापूर यांच्यावतीने ग्रंथ पुरस्कारासाठी साहित्य मागविण्यात येत आहे, अशी माहिती आनंद रंगराज व परशुराम कांबळे यांच्यावतीने देण्यात आली आहे.
सह्याद्री साहित्य मंचच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या ग्रंथ पुरस्कारासाठी लेखक, प्रकाशक यांच्याकडून पुस्तके मागविण्यात येत आहेत. १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत प्रसिद्ध झालेली पुस्तके २१ मार्च २०२४ पर्यत पाठवावीत असे आवाहन करण्यात आले आहे. सह्याद्री साहित्य मंचच्यावतीने कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, बेळगाव, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील साहित्यिकांकडून हे साहित्य मागविण्यात येत आहे. संस्थेमार्फत कावळटेककार अशोक पाटील पुरस्कार (कादंबरीसाठी), प्राचार्य जे. ए. साळोखे पुरस्कार (कथासंग्रहासाठी), कै.शोभा कांबळे पुरस्कार (कवितासंग्रहासाठी), लोकनेते बाळ पाटील पुरस्कार (प्रथम प्रकाशन पुस्तकासाठी) याबरोबरच वैचारिक / संशोधन, बालवाङ्मय पुरस्कारही देण्यात येणार आहेत.
इच्छुक लेखक, प्रकाशक यांनी पुस्तकाच्या दोन प्रती, फोटो आणि परिचय २१ मार्च २०२४ पर्यंत आनंद रंगराज, अध्यक्ष, सहयाद्री साहित्य मंच, ११५५/१, महालक्ष्मी कॉलनी, फुलेवाडी, रिंगरोड, कोल्हापूर. ४१६ ०९० या पत्यावर पाठवावे. अधिक माहितीसाठी कार्यवाह परशुराम कांबळे (पी.के.) ९३५६१९९०३८/९४२१२२७९८६ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.