September 25, 2023
Sandalwood santalum album medicinal plant information
Home » चंदन (ओळख औषधी वनस्पतीची)
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

चंदन (ओळख औषधी वनस्पतीची)

ओळख औषधी वनस्पतींची यामध्ये चंदन या वनस्पतीबद्दल माहिती…

– सतिश कानवडे

संस्थापक,
औषधी वनस्पती व आरोग्य पर्यटन केंद्र,
सावरचोळ, ता. संगमनेर, जि. नगर
मोबाईल 9850139011, 9834884804

वनस्पतीचे नाव- चंदन

वनस्पतीचे वर्णन

सेटालेसी कुळातील ही वनस्पती असून भारतामध्ये निरनिराळ्या ठिकाणी याची नैसर्गिक वाढ होते. खोडातील आतील भागातून सुवासिक तेल निघते.

औषधी उपयोग

खोडातील आतील भागात सेंटेलेल नावाचे अल्कोहोल असते. खोडाचे बारीक बारीक तुकडे करून त्याचे ऊर्ध्वपतन क्रियेने सुगंधी तेल काढतात. खोडाच्या चोथ्यापासून सुगंधी चंदन उदबत्ती तयार करतात. चंदनाचा वापर अनेक प्रकारच्या औषधी तयार करण्यासाठी करतात. चंदनाचा लेप विविध आजारावर वापरला जातो.

हवामान व जमिन

दमट उष्ण आणि समशीतोष्ण अशा निरनिराळ्या हवामानामध्ये चंदनाची वाढ चांगल्याप्रकारे दिसून येते. थंड हवामान आणि उतारावरील जमिनीवर याची वाढ चांगली होत नाही. त्याच्या मुळ्या जमिनीतून अन्न, पाणी घेवू शकत नाही. घाणेरी/तुरीच्या मुळी मधून सुरवातीला काही दिवस अन्न पाणी घेतात.

लागवड

चंदनास चांगल्या प्रकारे फळे आणि फुले येतात. चंदन ही परोपजीवी वनस्पती आहे. ७ ते ८ वर्षे दुसऱ्या झाडापासून अन्न आणि पाणी मिळवतात. जंगल/उसाच्या शेताच्या सभोवती चांगली वाढ होते.

काढणी

१० ते १५ वर्षांनी खोडाच्या मध्यभागी सुवासिक गाभा तयार होतो. प्रत्येक झाडास २००० ते १०००० पर्यंत किमत मिळते.

Related posts

‘ब्लू मॉरमॉन’ आले हो अंगणी

पूर्ण मिश्रित आहारामुळे होते पोषण, दुग्धवाढ

फळमाशीच्या समस्येवर करा हा उपाय

Leave a Comment