March 25, 2023
Information about Adulsa Plant
Home » अडुळसा (ओळख औषधी वनस्पतींची)
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

अडुळसा (ओळख औषधी वनस्पतींची)

ओळख औषधी वनस्पतींची यामध्ये अडुळसा वनस्पतीबद्दल जाणून घेणार आहोत. Information about Adulsa Plant

सतिश कानवडे

संस्थापक,
औषधी वनस्पती व आरोग्य पर्यटन केंद्र,
सावरचोळ, ता. संगमनेर, जि. नगर
मोबाईल 9850139011, 9834884804

अडुळसा वनस्पती

अडुळसा या वनस्पतीस वासा, वासिका, अडूसा १, वसाका अशीही नावे आहेत. हे सदैव हिरवे असणारे २ ते 3 मीटर उंच वाढणारे झुडूप आहे. पाने हिरवी लांबट व वर्तुळाकार टोकाकडे होत गेलेली असतात. मध्यम आकाराचे झुडूप सोट मुळ लांब वाढते. खोडाला फांद्या समोरासमोर लागतात. फळे उमलल्यावर सिंहाच्या जबड्यासारखी वाटतात.

अडुळशाचे औषधी उपयोग –

पानात व फुलात वासिसीन हे गुणद्रव्य असते त्यामुळे सर्व प्रकारचा खोकला, घश्याचे आजार, कफाचा विकार, दमा या रोगावर रामबाण उपाय आहे. आयुर्वेदिक औषधात खोकल्याच्या सर्व औषधात अडुळसाचा वापर करतात. तसेच संधिवात, गुडघेदुखी, फुफ्फुसांचे आजार, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, श्वसन विकार यावर उपयोगी.

लागवडीसाठी आवश्यक हवामान व जमीन –

कोकणातील उष्ण व दमट हवामानात चांगली वाढ होते. बांधावरसुद्धा लागवड करू शकतो.महाराष्ट्रातील कोकणपट्टी, ओरिसा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू व बंगाल तसेच समुद्रकाठचे प्रदेशात हिची वाढ चांगली होते.

लागवड पद्धती

छाट कलमाद्वारे पावसाळ्यात फांद्या लावून रोप तयार करता येते.

काढणी –

पानांची काढणी गरजेनुसार तिसऱ्या  महिन्यापासून करू शकतो नंतर जशी पाने छाटनीस तयार होतील तशी छाटणी करावी. वर्षातून ३ ते ४ वेळा छाटणी करावी.

Related posts

नैसर्गिक शेतीची लोकचळवळ उभारू – नरेंद्र मोदी

आरोग्यासाठी हवी हवेची गुणवत्ता…

सूत्रकृमीचा प्रादुर्भाव जाणून त्वरित करा उपाययोजना

Leave a Comment