ज्येष्ठ इतिहासकार उपिंदरसिंग (डॉ. मनमोहनसिंग यांच्या कन्या) यांना यंदाचा ‘सरहद’चा ‘संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार’ 16 जुन रोजी पुण्यात देणार
पुणे : सरहद संस्थेतर्फे 1993 साली सुरू झालेला प्रतिवर्षी देण्यात येणारा यंदाचा 19 वा संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार यंदा ज्येष्ठ इतिहासकार भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या कन्या आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त संशोधिका उपिंदर सिंग यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार यांनी दिली.
16 जुन 2024 रोजी सायंकाळी 5.00 वाजता एस. एम जोशी सोशलिस्ट फाउंडेशन पुणे 30 येथे भारताचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे हस्ते तसेच संतसिंग मोखा यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार देण्यात येणार आहे. याप्रसंगी रामदास फुटाणे, अरुण नेवासकर, चरणजितसिंग सहानी, सुरिंदरसिंग धुपड उपस्थित राहणार आहेत.
एक लक्ष, एक हजार रूपये आणि सन्मान चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून महाराष्ट्र आणि पंजाबचे नाते दृढ करणार्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर कतृत्व गाजवलेल्या केवळ पंजाबी व्यक्तीस प्रतिवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो.
यापूर्वी पंजाब केसरी वृत्तपत्र समुहाचे विजयकुमार चोपडा, चित्रपट निर्माते यश चोपडा, एस.एस.विर्क, सत्यपाल डांग, के. पी. एस. गिल, कवी गुलजार, माँटेकसिंग अहलुवालीया, मा. प्रकाशसिंग बादल, मा. एन. एन. व्होरा, मा. सतपाल मलिक, मा. ए.एस. दुल्लत, नवतेज सरना आदिंना हा पुरस्कार देण्यात आला असून यंदाचा 2024 चा 19 वा संत नामदेव पुरस्कार देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर दैदिप्यमान कामगिरी करणार्या इतिहासकार उपिंदरसिंग यांना देण्यात येणार आहे.
यापूर्वी शरद पवार, बाळासाहेब ठाकरे, सुशीलकुमार शिंदे, देवेंद्र फ डणवीस, पृथ्वीराज चव्हाण, अण्णासाहेब हजारे, राज ठाकरे, आर. आर. पाटील, नितीन गडकरी, हंसराज अहिर आदी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.