विठ्ठला तुझ्या वारीत
छान भजन गाता आलं
माणसांच्या समुद्राचा
एक थेंब होताआलं
किती अंतर चाललो
पायांना कळलं नाही
भिजलो चिखला पावसात
मन मात्र मळलं नाही
माऊली माऊली म्हणत
पावलं गिरकी घ्यायची
भूक सुद्धा कधीकधी
रजेवर निघून जायची
पडेल त्या जागी मुक्काम
कमीपणा वाटला नाही
तुझ्यासारखा देव
जगात भेटला नाही
फेर धरून नाचलो
सुरत सूर जुळाले
सुख काय असतं
हे दिंडीत कळाले
संतोष काळे,
मोबाईल – 9970330639
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.