ती भिजत होती
पाऊस पडत होता
ती भिजत होती
तो तिला पहात होता
क्षणभर
त्याच्या मनात विचार आला
उघडावी छत्री अन्
तिच्या डोक्यावर धरावी
आणि पावसाला म्हणावे
तुझ्या निष्ठूरपणाला
मी आव्हान करतो
भिजवून दाखव आता
त्या चिरतरुण लावंण्याला
तुझ्या जलधारांनी
भिजवयाचा अधिकार
तुला कोणी दिला?
पण
मनातला विचार मनातच राहिला
कारण त्या क्षणाला
छत्री नव्हतीच हाताला
मग पुन्हा नीटपणे
निरखून तिला पाहिले
तर भ्रमनिरास झाला
कारण ती स्वतःच
आनंदाने उतरली होती
पावसात भिजायला
पुन्हा विचारांचे मनोरे उभारत
तो तिला बघत होता
आणि ती
मनसोक्त पावसात भिजण्याचा
आनंद लुटत होती….
चंद्रशेखर प्रभाकर कासार
चांदवडकर ,धुळे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
