प्राचार्य डॉ. किसनराव पाटील वाङ्मय पुरस्कारांची घोषणा :🌿
प्राचार्य डॉ. किसनराव पाटील वाङ्मय पुरस्कारासाठी यंदाच्या वर्षी बालकुमार वाङ्मय प्रकारासाठी पुरस्कार देण्यात आले आहेत. मराठीचे अभ्यासक, संशोधक मार्गदर्शक व सुप्रसिद्ध साहित्यिक समीक्षक प्राचार्य डॉ. किसनराव पाटील (जळगाव) यांचे स्मरणार्थ महाराष्ट्र साहित्य परिषद व किसनराव पाटील ज्ञानपरंपरा यांचे वतीने प्राचार्य डॉ. किसनराव पाटील राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार व प्राचार्य डॉ. किसनराव पाटील खानदेशस्तरीय वाड्:मय पुरस्कार देण्यात येतात.
यंदाच्या वर्षीच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असल्याची माहिती डॉ.अशोक कौतिक कोळी व प्रा.डॉ.वासुदेव वले यांनी दिली आहे.
प्राचार्य डॉ. किसनराव पाटील राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार, २०२४ प्रशांत असनारे ( अकोला ) यांच्या ‘मोराच्या गावाला जाऊ’ या बालकाव्यास व वीरभद्र मिरेवाड ( नांदेड ) यांच्या ‘योद्धा’ या बालकादंबरीस विभागून देण्यात आला आहे. ११,००० रुपये रोख, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
प्राचार्य डॉ. किसनराव पाटील खानदेशस्तरीय पुरस्कार, २०२४ चंद्रकांत भंडारी (जळगाव) यांच्या देव भेटलेले विद्यार्थी’ या बालकादंबरीस व नीता प्रवीण शेंडे यांच्या पाखरांची शाळा’ या बालकाव्य पुस्तकास विभागून देण्यात आला आहे. ५००० रुपये रोख, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.