...तू...आणि.....मी तू आहेस सधवा मी आहे ग विधवा हिरवीगार तुझी साडी मी नेसते पांढरी साडी.. हिरवा चुडा भरून हात माझा लपवते मुंडा हात.. तुझ्या गळ्यात डोरलं मीही होतं घातलेलं... तुला सवाष्णीचा मान माझा विधवेचा अपमान... तुझ्या जोडव्याची किणकिण माझी सावलीही अभागिन.... तुझं कुंकवाच कपाळ माझं दिसे पांढरं भाळ.... खणनारळ तुझ्या ओट्यात नुसता ब्लाउझ पिस माझ्या हातात. कुणी केला हा भेदभाव मला तुलाही नाही ठावं.... गजरा तुझ्या अंबाड्यावर माझ्या अंबाड्यावर पदर.... तू सवाष्णीचा तोरा मिरवत मी विधवेची शिक्षा भोगत... रूढी परंपरा तू जपत मन मारून मी जगत.... दे सारे बंधन झुगारून दाखव सौभाग्यअलंकार घालून करते सुरुवात माझ्यापासून घेतेसर्वांची बोलणी ऐकून.... नाही कुणास घाबरणार हाच समाज नंतर वाहवा करणार. कवयित्री - वीणा पाटील, कोल्हापूर

Home » तू…आणि….मी
previous post
next post