March 31, 2025
Meteorologist Manikrao Khule predicts unseasonal weather will clear soon.
Home » अवकाळीचे वातावरण निवळणार
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

अवकाळीचे वातावरण निवळणार

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.

माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.

प्रश्न – अवेळी पावसाची शक्यता आहे का ?

माणिकराव खुळे – उद्या सोमवार २४ मार्चपासून महाराष्ट्रातील अवकाळी पावसाचे वातावरण निवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे रब्बी पीक काढणी दरम्यानचा अवकाळी पावसापासूनचा नुकसानीचा धोका टळू शकतो, असे वाटते.

प्रश्न – सध्या तापमान कसे राहील ?

माणिकराव खुळे – मागील आठवडयात ३ ते ४ दिवस एकाकी झालेल्या दिवसाच्या कमाल तापमान वाढीतून उष्णतेमुळे कांदा, गहू सारख्या रब्बी पिकावर विपरित परिणाम जाणवला. परंतु अवकाळीच्या ह्या वातावरणामुळे लगेचच २ ते ३ अंशाने घसरलेल्या कमाल व किमान तापमानामुळे पिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

सध्या दिवसाचे कमाल तापमान, कोकणात ३० ते ३२ तर उर्वरित महाराष्ट्रात ३६ अंश दरम्यान आणि  किमान तापमान हे  १८ ते २० अंश दरम्यान जाणवत आहे. ही दोन्हीही तापमाने सरासरी इतक्याच श्रेणीत आहे. ही जमेची बाजू समजावी.

प्रश्न – पुढील तापमानाची शक्यता काय ?

माणिकराव खुळे – कमाल तापमानात वाढीची शक्यता जरी वर्तवली जात असली तरी पुढील १० ते १२ दिवस म्हणजे गुढीपाडवा व त्यानंतरही २ ते ३ दिवस म्हणजे साधारण बुधवार २ एप्रिलपर्यन्त कमाल व किमान तापमाने ही महाराष्ट्रात सरासरीच्या खाली असण्याची शक्यता जाणवते. त्यामुळे पिकांना मदतच होईल, असे वाटते.
शिवाय उभ्या असलेल्या रब्बी पिकांचा, गत ६० ते ६५ दिवसाचा अवकाळी व गारपिटीचा धोक्याचा काळही निभावला आहे, असे समजू या !

प्रश्न – एप्रिलच्या पहिल्या आठवडयात अवकाळीची शक्यता जाणवते काय ?

माणिकराव खुळे – कमकुवत ‘ला-निना’ व तटस्थ ‘आयओडी’ ह्या स्थितित जरी सध्या काहीही  बदल जाणवत नसला तरी ‘एमजेओ’ ची सायकल, एप्रिलच्या पहिल्या आठवडयात, भारत महासागरीय परीक्षेत्रात प्रवेश करण्याच्या शक्यतेमुळे त्याच्या परिणामातून काय वातावरणीय बदल घडून येतील हे त्याचवेळी लघुपल्ल्याच्या अंदाजात कळून येईल. मार्चअखेरीस ह्याचाही  खुलासा होवू शकतो असे वाटते.
जागतिक हवामान दिनाच्या सर्वांना शुभेच्छा !


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading