April 24, 2024
Cloudy with rain likely in Maharashtra
Home » महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता
काय चाललयं अवतीभवती

महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता

अवकाळीचे वातावरण

मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यात उद्या (ता. ३० मार्चला) ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी अगदीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.

उष्णतेची लाट-

विदर्भातील ११ जिल्ह्यात आज व उद्या (ता. २९ व ३० मार्चला) दोन दिवस भाग बदलत उष्णतेच्या लाटेची शक्यता जाणवते. संपूर्ण विदर्भ व मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील भाग बदलत काही ठिकाणी दुपारी ३ चे कमाल तापमान हे ४० ते ४२ डिग्री से. ग्रेड च्या श्रेणीत जाणवत असुन ते सरासरी कमाल तापमानापेक्षा ३ ते ४ डिग्रीने अधिक आहे.

रात्रीचा उकाडा-

मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यात आज व उद्या (ता. २९ व ३० मार्चला) दोन दिवस दिवसा चांगलीच उष्णतेची काहिली तर रात्री उकाडा जाणवू शकतो.

किनारपट्टीवरील दमटयुक्त उष्णता-

मुंबईसह कोकणातील ७ जिल्ह्यात तसेच लगतच्या गोवा व गुजराथ राज्यात आज व उद्या (२९-३० मार्चला) दोन दिवस दिवसा दमटयुक्त उष्णतेचा अनुभव येईल.

माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ


Related posts

कोरोनाच्या विधायक बाजूंचा पहिला लेखाजोखा – लढा कोरोनाशी

अमरेन्द्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे पुरस्कार जाहीर

 नफरत छोडो… भारत जोडो

Leave a Comment