सोयाबिन, कापसाला भाव का मिळत नाही याचे अर्थशास्त्र समजून घेण्याची गरज – विजय जावंधिया
जावंधिया काय म्हणाले,
१. सोयाबिन अन् कापसाच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दर अन् देशाअंतर्गत बाजारपेठेतील दर यात तफावत आहे
२. सोयाबिनमधील तेल काढून घेतल्यानंतर शिल्लक राहणारी पेंड निर्यात केली जात होती त्याला दर चांगला मिळत होता त्याचे भाव आता घरसले आहेत यामुळे सोयाबिनला भाव मिळणे कठीण झाले आहे. हीच स्थिती कापसाच्या बाबतही आहे.
३. तेल आयात केल्याने सोयाबिनचा दर पडतो हे म्हणने चुकीचे
४. मुक्त अर्थव्यवस्थेचा फटका शेतकऱ्यांना बसतो आहे हे विचारात घेणे गरजेचे
५. उत्पादन वाढविल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारत नाही तर त्याच्या शेतमालाला दर मिळाला तरच शेतकऱ्यांची स्थिती सुधारते हे स्वामीनाथन यांचे विचार लक्षात घेणे गरजेचे त्यानुसार अर्थव्यवस्थेचा अभ्यास होणे गरजेचे तरच शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारेल.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.