कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने कवितासंग्रहासाठी डॉ. धम्मपाल रत्नाकर यांच्या स्मृत्यर्थ राज्यस्तरीय काव्यपुरस्कार देण्यात येणार आहे. २०२४ या वर्षात प्रकाशित झालेले काव्यसंग्रह त्यासाठी पात्र ठरतील.
नव्या पिढीतील ख्यातनाम कवी आणि कादंबरीकार डॉ. धम्मपाल रत्नाकर यांच्या आकस्मिक निधनानंतर २०१२ पासून दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने त्यांच्या स्मृत्यर्थ रत्नाकर काव्य पुरस्कार देण्यात येतो. या अगोदर हे पुरस्कार सुरेश सावंत, अजय कांडर, श्रीकांत देशमुख, श्रीधर नांदेडकर, कल्पना दुधाळ, सारिका उबाळे, पी. विठ्ठल, अरुण इंगवले, संजीवनी तडेगावकर, सुचिता खल्लाळ, पद्मरेखा धनकर, दीपक बोरगावे, कविता मुरूमकर, हबीब भंडारे, गोविंद काजरेकर, राजेंद्र दास, केशव सखाराम देशमुख, कीर्ती पाटसकर, अनिल धाकू कांबळी, ऐश्वर्य पाटेकर यांना मिळाले आहेत. दहा हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. यासाठी ०१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ या वर्षात प्रकाशित झालेल्या काव्यसंग्रहाच्या दोन प्रती ३१ मार्च २०२५ पर्यंत पाठवाव्यात.
पुस्तके पाठविण्याचा पत्ता –
कार्यवाह,
दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा,
ए वॉर्ड, ६ स्मृती अपार्टमेंट, बाबूजमाल रस्ता,
सरस्वती टॉकीज जवळ, कोल्हापूर – ४१६०१२
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.