📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
October 27, 2026
काय चाललयं अवतीभवती

तंजावरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी

Celebration of Chhatrapati Shivaji Maharaj’s 396th birth anniversary at Sadar Mahal Palace, Thanjavur by Tamil Nadu Maratha Association

तंजावर (तमिळनाडू) – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त तंजावर येथील सदर महाल पॅलेसमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम तमिळनाडू मराठा संघटना Tamil Nadu Maratha Association (TMA) यांच्या वतीने रविवारी, २२ फेब्रुवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाला तमिळनाडू मराठा असोसिएशनचे अध्यक्ष विश्वजीत घाडे राव, तंजावर अध्यक्ष अलेक्झांडर भोसले यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, सदस्य आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांच्या पराक्रम, दूरदृष्टी आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदानाचे स्मरण केले.

या विशेष प्रसंगी तंजावरच्या प्रिंन्स सरफोजी राजे भोसले व त्यांचे सुपुत्र प्रिंन्स प्रतापसिंह सरफोजी राजे भोसले यांनी कार्यक्रमास व उपस्थित मान्यवर सभासदांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमात शिवाजी महाराजांच्या आदर्शांचा गौरव करण्यात आला तसेच मराठा परंपरा, इतिहास आणि संस्कृती जपण्याचा संदेश देण्यात आला. भक्तिभाव आणि अभिमानाच्या वातावरणात हा सोहळा पार पडला.

Related posts

सत्याचा शोध घेणे हेच काम कवीचे असते – अजय कांडर

कामदा एकादशीनिमित्त पंढरपूर विठ्ठल मंदिरात द्राक्षांची आरास

सध्याचा काळ हा आंधळ्या अंधारातील बहिरी शांतता असलेला – साहित्यिक प्रा.कृष्णात खोत

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406