लक्ष्मण महाडिक, ज्योती सोनवणे, रमेश रावळकर, वीणा रारावीकर, राजेंद्र उगले, प्रसाद ढापरे, डॉ.स्मिता दातार, डॉ. राजेंद्र राऊत यांच्या साहित्य कृतींना पुरस्कार जाहीर
शं.क.कापडणीस यांना जीवनगौरव तर निशा डांगे-नायगावकर यांना साहित्यरत्न
नाशिक : अक्षरबंध फाउंडेशनतर्फे आयोजित राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. मराठी साहित्य समृद्ध करणाऱ्या लिहित्या हातांचा गौरव करण्याच्या उद्देशाने अक्षरबंध परिवाराने या वर्षापासून राज्यस्तरीय ‘अक्षरबंध’ साहित्य पुरस्कार सुरू केले आहे. या स्पर्धेसाठी सर्व साहित्य प्रकारांत एकूण 345 साहित्यकृतींचे प्रस्ताव आले होते. त्यातून परीक्षकांनी खालील साहित्यकृतींची निवड केली. या पुरस्कारांचे लवकरच नाशिक येथे एका कार्यक्रमात वितरण करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष प्रवीण जोंधळे, उपाध्यक्ष सप्तर्षी माळी, सचिव साई बागडे, खजिनदार सुवर्णा घुगे, सदस्य कल्याणी देशपांडे, डॉ. गणेश मोगल, योगेश विधाते यांनी दिली.
लक्ष्मण महाडिक, ज्योती सोनवणे, रमेश रावळकर, वीणा रारावीकर, राजेंद्र उगले, प्रसाद ढापरे, डॉ.स्मिता दातार, डॉ. राजेंद्र राऊत यांच्या साहित्य कृतींना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर शं.क.कापडणीस यांना जीवनगौरव व निशा डांगे-नायगावकर यांना साहित्यरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे.
जाहीर पुरस्कार असे –
1) सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रह-
स्त्री कुसाच्या कविता- लक्ष्मण महाडिक (पिंपळगाव, जि.नाशिक)
पुरस्काराचे स्वरूप : रोख 3000/- + स्मृतिचिन्ह + सन्मानपत्र
पुरस्कृत : शं. क. कापडणीस, सटाणा
2) सर्वोत्कृष्ट कथासंग्रह –
दमकोंडी – ज्योती सोनवणे (औरंगाबाद)
पुरस्काराचे स्वरूप : रोख 3000/- + स्मृतिचिन्ह + सन्मानपत्र
पुरस्कृत : नाना देवरे यांच्या स्मरणार्थ श्रीमती सरोजिनी देवरे, मुंबई
3) सर्वोत्कृष्ट कादंबरी-
टिश्यू पेपर – रमेश रावळकर (औरंगाबाद)
पुरस्काराचे स्वरूप : रोख 3000/- + स्मृतिचिन्ह + सन्मानपत्र
पुरस्कृत : डी. के. चौधरी, तळेगाव
4) सर्वोत्कृष्ट बालसाहित्य (कविता)-
थांब ना रे ढगोबा – राजेंद्र उगले (नाशिक)
पुरस्काराचे स्वरूप : रोख 3000/- + स्मृतिचिन्ह + सन्मानपत्र
पुरस्कृत : सुमन अर्जुन माळी यांच्या स्मरणार्थ दीपाली महाजन, पुणे
5) सर्वोत्कृष्ट चरित्र –
प्रभु आजि गमला- डॉ. स्मिता दातार (मुंबई)
पुरस्काराचे स्वरूप : रोख 3000/- + स्मृतिचिन्ह + सन्मानपत्र
पुरस्कृत : लक्ष्मण बोंबले यांच्या स्मरणार्थ दीपाली मोगल-बोंबले, नाशिक
6) सर्वोत्कृष्ट ललित –
आकाशवीणा- वीणा रारावीकर (मुंबई)
पुरस्काराचे स्वरूप : रोख 3000/- + स्मृतिचिन्ह + सन्मानपत्र
पुरस्कृत : ज्ञानदेव भालके यांच्या स्मरणार्थ कपिल भालके, दहावा मैल, ओझर
7) सर्वोत्कृष्ट समीक्षा –
लीळाचरित्रातील कथनरुपे – डॉ. राजेंद्र राऊत (अमरावती )
पुरस्काराचे स्वरूप : रोख 3000/- + स्मृतिचिन्ह + सन्मानपत्र
पुरस्कृत : वासुदेव आणि रंभाबाई विधाते यांच्या स्मरणार्थ
सुयश कॉम्प्युटर, ओझर
8) सर्वोत्कृष्ट मराठी अनुवाद –
इकिगाई- प्रसाद ढापरे (पुणे)
पुरस्काराचे स्वरूप : रोख 3000/- + स्मृतिचिन्ह + सन्मानपत्र
पुरस्कृत : रामदास ढोकणे यांच्या स्मरणार्थ दशरथ ढोकणे, शेवगेदारणा
9) अक्षरबंध जीवनगौरव –
शंकर कापडणीस (सटाणा)
पुरस्काराचे स्वरूप : रोख 5000/- + स्मृतिचिन्ह + सन्मानपत्र
पुरस्कृत : आबा शिंदे, दहावा मैल, ओझर
10) अक्षरबंध साहित्यरत्न पुरस्कार –
निशा डांगे-नायगावकर (पुसद)
पुरस्काराचे स्वरूप : रोख रक्कम + स्मृतिचिन्ह + सन्मानपत्र
पुरस्कृत : सुवर्णा घुगे, नाशिक रोड
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.