दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने कोल्हापूर ,सांगली, सातारा ,सोलापूर या जिल्ह्यांसह सीमाभागातील मराठी लेखकांच्या उत्कृष्ट साहित्यकृतींना पुरस्कार
विजय जाधव, शिवाजी सातपुते, नीरज साळुंखे, संजय हळदीकर, रमजान मुल्ला यांनादमसा
चे ग्रंथ पुरस्कार
कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने देण्यात येणाऱ्या २०२१ मधील ग्रंथ पुरस्कारासाठी विजय जाधव, नीरज साळुंखे, शिवाजी सातपुते, रघुनाथ कडाकणे, रमजान मुल्ला, चंद्रकांत खामकर, संजय हळदीकर आदींच्या पुस्तकांची निवड करण्यात आली आहे. १८ सप्टेंबर २०२२ रोजी पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे, अशी माहिती दमसाचे कार्याध्यक्ष प्रा. दि. बा. पाटील आणि कार्यवाह डॉ. विनोद कांबळे यांनी दिली आहे.
पुरस्कार प्राप्त पुस्तके आणि लेखकांची नावे अशी-
१. देवदत्त पाटील पुरस्कार: विजय जाधव – पाऊसकाळ (कादंबरी )
२. शंकर खंडू पाटील पुरस्कार: चंद्रकांत खामकर – कोरोनाकांड (कथासंग्रह)
३. अण्णा भाऊ साठे पुरस्कार: नीरज साळुंखे – स्वराज्यनिर्माते शाहजी महाराज (आत्मचरित्र)
४. कृ. गो. सूर्यवंशी पुरस्कार: रघुनाथ कडाकणे – उदाहरणार्थ कोसलाआणि कॅचर इन द राय ( संकीर्ण)
५ . शैला सायनाकर पुरस्कार: शिवाजी सातपुते – दखल बेदखल (कवितासंग्रह),
६ .चैतन्य माने पुरस्कार (प्रथम प्रकाशन) – रमजान मुल्ला – अस्वस्थ काळरात्रीचे दृष्टांत (कवितासंग्रह ) आणि
७. बालवाड्मय पुरस्कार – संजय हळदीकर – मुलंच मुलं
विशेष पुरस्कार :
१. माधव मुकुंद कामत पुरस्कारः भुईभिंगरी – वसंत खोत ,
२.पी.सी.पाटील पुरस्कारः पाणजंजाळ – सुरेश पाटील,
३. नामदेव भोसले पुरस्कार – परतीचा पाऊस – यशवंत माळी
४.बाळ पोतदार पुरस्कार – माझ्या जगण्याचे पुस्तक – वि. म. बोते
इतरः
५.बॅरिस्टर नाथ पै – अनंत घोटगाळकर
६. रथ – गोपाळ महामुनी
७. राजकीय नाटक आणि गो. पु. देशपांडे – रमेश साळुंखे
८. एकलव्यायन – अर्जुन कुंभार.
९. मराठी कविता परंपरा आणि प्रवाह – सुहासकुमार बोबडे
१०. जांभळमाया – सुभाष कवडे
११. ऊसकोंडी – श्रीकांत पाटील
१२. दख्खन समृद्ध प्रवास – राकेश साळुंखे
१३. राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्र सेवा दल – प्रवीण कोडोलीकर
१४. संविधानाच्या स्वप्नातलं गाव – सुभाष वाघमारे
१५. अक्षरलेणं – ऋजुता माने
१६.नाही गिरवता येत कुठलीच लिपी – स्मिता पाटील
१७. तौलनिक साहित्य अभ्यास – भरत जाधव
१८. स्त्रीहुंकार – कालिंदी कुलकर्णी
१९. बोचऱ्या सुया – राजश्री पाटील
२०. मराठी हास्यात्मिका – आनंद बल्लाळ
२१. ऐसे नको गोरक्षण – दत्ता जाधव
२२. आव्हाने पेलताना – अश्विनी टेंबे
२३. सोनोग्राफी – विजयकुमार माने
२४. कुरकूल – उत्तम सावंत
२५. स्वप्नसत्य – सचिन इनामदार
२६. हिकमत – सुवर्णा पवार
२७. शिरवाळ – हरिश्चंद्र पाटील.
२०२१ या वर्षातील ग्रंथ पुरस्कारासाठी परीक्षक म्हणून ज्येष्ठ समीक्षक प्रा.अविनाश सप्रे, प्रा.वैजनाथ महाजन, प्रसाद कुलकर्णी, डॉ. आलोक जत्राटकर, गौरी भोगले यांनी काम पाहिले. पुरस्कार वितरण समारंभ रविवारी १८ सप्टेंबर२०२२ रोजी सकाळी अकरा वाजता शाहू स्मारक भवन , दसरा चौक,कोल्हापूर येथे मान्यवरांच्या हस्ते होणार असल्याचे दमसाचे कार्याध्यक्ष प्रा. दि. बा. पाटील, कार्यवाह डॉ. विनोद कांबळे यांनी कळवले आहे.