प्रतिमा इंगोले (पुणे), दीपक तांबोळी (जळगाव), राजेश गायकवाड (औंढा नागनाथ), विरभद्र मिरेवाड (नांदेड) , गणपती कमळकर (कागल) या साहित्यिकांच्या साहित्यकृतींचा पुरस्कारामध्ये समावेश
गारगोटी येथील अक्षरसागर साहित्य मंचचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले. भुदरगड साहित्य भूषण पुरस्कार यंदा कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे (पुष्पनगर) यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती मंचचे अध्यक्ष डॉ. मा. ग. गुरव यांनी दिली. उत्कृष्ट साहित्य पुरस्कार, विशेष साहित्य पुरस्कार,
जाहीर करण्यात आलेले पुरस्कार असे –
उत्कृष्ट साहित्य पुरस्कार असे –
1) प्रतिमा इंगोले (पुणे) – राशाटेक ( कादंबरी )
2) दीपक तांबोळी (जळगाव) – अशी माणसं अशा गोष्टी – कथासंग्रह
3) राजेश गायकवाड (औंढा नागनाथ) – बिन चेहऱ्याच्या कविता ( काव्य )
4) विरभद्र मिरेवाड (नांदेड) – आनंदाची फुलबाग (बालसाहित्य)
5) गणपती कमळकर (कागल) – ऑनलाईन शिक्षणपद्धती ( संकिर्ण )
विशेष साहित्य पुरस्कार असे –
1) डॉ. मनःसाद (सोलापूर) – कादंबरी
2) भास्कर बंगाळे (पंढरपूर) – वंशाचा दिवा (कथासंग्रह)
3) सुभाष वाघमारे (सातारा) – मी भारतीय (काव्य)
4) सुनील विभुते (बार्शी) – बालसाहित्य
5) प्रतिभा जाधव (नाशिक) – संकिर्ण
भुदरगड तालुका अक्षरसागर पुरस्कार असे –
1) मायकेल डिसोजा (करडवाडी) – उनाड पोरं ( कादंबरी)
2) अरविंद मानकर (सरवडे) – कथासंग्रह
3) साताप्पा सुतार (पुष्पनगर) – वाकळ ( काव्य)
4) दीक्षा गुरव (गंगापूर) – सावित्रीच्या लेकी ( काव्य)
5) अशोक पाटील (पाचर्डे) – बोचकं (लेखसंग्रह)
6) भरत चौगले (थड्याचीवाडी) – झुंज (संकिर्ण)
7) कुमार हेगडे (कारदगा) – बालसाहित्य
या पुरस्कारांचे वितरण सोमवारी (ता.२७ फेब्रुवारी) गारगोटी येथील शाहु वाचनालयामध्ये सायंकाळी पाच वाजता होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन सहाय्यक महसूल आयुक्त कुलदीप राजे यांचे हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष बजरंग देसाई असून प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कादंबरीकार कृष्णात खोत उपस्थित राहणार आहेत.
यावेळी डॉ. अर्जुन कुंभार, डी. व्ही. कुंभार, डॉ. युवराज देवाळे, राणी हुजरे, बाजीराव जठार, सुदेश सापळे, विजय कोटकर, धनाजी आरडे, अनिल कामीरकर, आनंद चव्हाण, रविराज पाटील, शिवाजी सावंत, मिलिंद पांगीरेकर, शिवाजी पाटील, अर्जुन दाभोळे आदी उपस्थित होते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.