- पुरस्कारासाठी संपादन, समिक्षा ग्रंथ पाठविण्याचे आवाहन
- मातोश्री रुक्मिणी पांडुरंग भोसले स्मृती पुरस्काराचे यंदाचे चौथे वर्ष
पुणे – वडशिवणे, ता. करमाळा येथील विश्वकर्मा तरुण मंडळाच्या वतीने दरवर्षी मातोश्री रुक्मिणी पांडुरंग भोसले स्मृती पुरस्कार देण्यात येतो. यंदाच्या वर्षी संपादन व समीक्षा ग्रंथासाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सोमनाथ टकले यांनी दिली. यावेळी प्रा. बाबुराव इंगळे, श्री दत्तात्रय पिसाळ, दिनेश आदलिंगे ,डॉ. जनार्दन भोसले हे उपस्थित होते.
यापूर्वी संतोष गोणबरे, प्रकाश लावंड, मेघा पाटील, गणपत जाधव या साहित्यिकांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. यंदा पुरस्काराचे हे चौथे वर्ष आहे. या वर्षासाठी १ जानेवारी २०२३ ते ऑक्टोंबर २०२४ या कालावधीत प्रकाशित संपादन व समीक्षा ग्रंथाच्या दोन प्रती, अल्प परिचय पाठवावा. रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तरी साहित्यिकांनी ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत आपले साहित्य पाठवावे.
साहित्य पाठविण्याचा पत्ता –
डॉ जनार्दन पांडुरंग भोसले, सिद्धिविनायक बिल्डिंग, श्री समर्थ कृपा, सदनिका क्रमांक बी २०२, प्रभात प्रेस रोड, शंकर महाराजमठा शेजारी, नऱ्हे, पुणे ४११०४१
अधिक माहितीसाठी संपर्क – मोबाईल नंबर ८६६९०९१३४९
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.