💦 विवाह जमवणे ही अतिशय गंभीर समस्या बनली आहे.. तेव्हा समाज जागृती व्हावी ह्या दृष्टीकोनातून सुभाष कासार यांनी मांडलेली रचना..
शिकली सवरली..
शिकली सवरली, हुशार झाली,
कोण म्हणतो कामातून गेली..
आयकेना ती आईबापाच,
आपलेच गुण काय गाते..
भूषण भारी, टोमणा मारी,
बँकेत म्हणे उघडले खाते….
शिकली सवरली, कामा लागली,
कोण म्हणतो कामातून गेली….
लग्नाचा हा विषय काढता,
ताल काय हिचाच जातो..
जोडीदार हवा हिला बेताचा,
गुणमेलन मेळ कुठे खातो..
शिकली सवरली, शहाणी झाली,
कोण म्हणतो कामातून गेली..
तीसीत आली, लाज वाटेना,
शरीर लागले की सुटायला..
लग्नाच्या हिचा प्रश्न सुटेना,
रघत लागले की आटायला….
शिकली सवरली, वेडी बी झाली,
कोण म्हणतो कामातून गेली….
हिचं पुढं कसं काय होणार?
जीवाला नुसता लागला घोर..
म्हातारपणात नको आधार,
कधी व्हायची मोठी हिची पोर….?
शिकली सवरली, पागल झाली,
कोण म्हणतो कामातून गेली….
कवी – सुभाष कासार
नवी मुंबई..💦
- गुहागरच्या पसायदान प्रतिष्ठानचे साहित्य पुरस्कार जाहीर
- प्रा. एन. डी. पाटील लिखित ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे: एक उपेक्षित महात्मा’ पुस्तकाचे प्रकाशन
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.