आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ
माणिकराव खुळे
मोबाईल – 9423217495
पावसासाठी अति अनुकूल अशा मुख्य प्रणाल्यातून पुढील ५ दिवस म्हणजे शनिवार दि.१३ जुलै पर्यन्त कोकणात अतिजोरदार, विदर्भात जोरदार, तर मराठवाड्यातील तसेच खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते.
या आहेत मुख्य प्रणाल्या –
i) मान्सूनचा मुख्य आस सरासरी जागेच्या दक्षिणेकडे स्थलांतर ✔️
ii)अरबी समुद्रात महाराष्ट्र ते केरळ पश्चिम किनारपट्टी समांतर समुद्रसपाटीला हवेच्या कमी दाब क्षेत्राचा निर्वात पोकळीचा पट्टा म्हणजे द्रोणीय आकारातील तटीय (‘ ऑफ-शोर-ट्रफ ‘ ) आसा चे अस्तित्व✔️
iii)अठरा डिग्री अक्षवृत्त समांतर, महाराष्ट्राच्या मध्यावरून जाणारा ३.१ ते ७. ६ किमी.उंचीवर हवेच्या साडेचार किमी. जाडीत हवेचा कमी दाबाचा आस व त्यातून तयार झालेला वाऱ्यांचा शिअर झोन ✔️
iv)दक्षिण गुजराथ क्षेत्रात स. सपाटीपासून दिड किमी. उंचीपर्यंत तयार झालेली चक्रीय वाऱ्याची स्थिती ✔️
माणिकराव खुळे
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.