February 22, 2024
Salivary scabies a serious problem of cattle breeders
Home » लाळ्या खुरुकुत: पशुपालकांची एक गंभीर समस्या
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

लाळ्या खुरुकुत: पशुपालकांची एक गंभीर समस्या

साधारणत: नोव्हेंबर – डिसेंबर  महिन्यात लाळ्या खुरुकुत रोगाची साथ सुरु होते व ती जून महिन्यापर्यंत राहते. परंतु आपल्याकडे शेतकरी कोणत्याही रोगाकडे गांभीर्याने पाहत नाही. ज्या वेळेस या रोगाची साथ सुरु होते त्यावेळेस शेतकऱ्याची धावपळ सुरु होते.

       लाळ्या खुरुकुत रोगाला इंग्लिशमध्ये फुट ऑणड माऊथ डीसीज असे म्हणतात ( Foot and Disease). या रोगाचा प्रसार झाल्यास होणारे नुकसान हे फार असते  हा रोग विषाणू पासून होतो.हा विषाणू इतर विषाणू पेक्षा लहान असतो.या विषाणू चे रोग प्रतिकार क्षमताशात्रानुसार वेगवेगळे सात प्रकार आहेत जसे कि,A,O,C.ASIA,SAT-1,SAT-2, SAT-3 थोडक्यात मानवाप्रमाणे भाऊ बंदकी होय पुन्हा त्यांचे उप प्रकार आहेत. आपल्या देशात O,A,C आणि ASIA-1 या विषाणूंचा प्रभाव जास्त आहे. हा रोग लाळ्या खुरुकुत, लाळ खुरी, तोंड खुरी ई. नावाने ओळखला जातो. या रोगाची लक्षणे प्रमुखाण्याने तोंड व पायाच्या खुरी यांच्याशी संबधित असल्यामुळे त्याचे नामकरण असे केले आहे. हा रोग ज्या जनावरांच्या खुरी दुभंगलेल्या आहेत त्यांनाच होतो. उदा. गाय, म्हैस , डुक्कर , शेळी आणि मेंढी , हरीण ई. जनावरांना होतो. या रोगाचा प्रसार अतिशय झपाट्याने होतो.

  रोगाची प्रमुख लक्षणे:- 

  • लाळ्या खुरुकुत संक्रमण काळ सुमारे ३ ते ७ दिवस आहे.
  • जनावरास प्रथम ताप येतो. अन्न पाणी कमी होते, थकवा येतो, रुक्ष पणा येतो, तोंडातून लाळ गळणे सुरु होते.
  • तोंडात हात घातल्यास गरमपणा जाणवतो .
  • तोंडातील आतील भागात जीभ, हिरड्या ,ओठ, नाकपुड्या या वर फोड येतात. हे फोडफुटल्या नंतर त्याचे रुपांतर व्रनात होते.
  • काही वेळेस जिभेवरील पूर्ण आवरणच निघून जाते. त्यामुळे जनावरांना अन्न पाणी घेणे अश्यक्य ठरते .
  • जनावरांना च्या तोंडातून सारखी लाळ गालात राहते व तोंडाची हालचाल करणे कठीण होते.
  • काही वेळेस स्तनाग्रह कासेवर फोड व नंतर व्रण होतात. कासेअस स्तनदाह होतो.
  • अशाच प्रकारचे फोड खुरीवर येतात , ती फुटतात ,तेथे जखम होते. दुर्लक्ष केल्यास जनावरांची खुरी सुद्धा गळून पडतात त्यामुळे जनावरास चालणे फिरणे मुश्किल होते.
  • याच काळात जीवाणूंच्या  दुय्यम संक्रमणामुळे इतात संसर्गजन्यरोगांचा धोका होऊ शकतो. दुर्लक्ष झाल्यास ९० टक्के जनावरांचा मृत्यु होतो.

रोगाचे दुष्परिणाम :

या रोगामुळे  सामान्यात: मोठी जनावरे मरत नाहीत; परंतु दुध, मांस लोकर, कातडी उत्पादन आणि काम करण्याच्या क्षमतेवर होणाऱ्या कमतरतेमुळेही मोठे आर्थिक नुकसान होते. तसेच इतर देश निर्यात बंदी घालतात त्यामुळे परकीय चलनस मुकावे लागते.

 या रोगातून सावरलेली जनावरे पूर्णपणे पुर्ववत कार्यक्षम होऊ शकत नाहीत. त्यांच्यात गर्भपात , वंधत्व येणे, अंगावर केसांची वाढ होणे, पांडुरोग, उष्णता सहन करण्याची क्षमता कमी होते.थोडे ऊन वाढले कि जनावरे लाखतात व ते सावली शोधतात .  त्यांचे दुग्ध उत्पादन कमी होते.या रोगामुळे दरवर्षी  बरेच आर्थिक नुसान होते.

औषधोपचार :-

हा रोग विषाणूजन्य असल्यामुळे यावर औषधोपचार नाही परंतु रोग लक्षणावरून आपण काही उपचार करू शकतो त्यामुळे जनावरांना तोड आराम मिळू शकतो. जनावरांचे तोंड पोटयाशियम पर्मागनेट च्या द्रावणाने धुवावे नंतर जिभेवर बोरोग्लीसरीन, लोणी/ खोबऱ्याचे  तेल  व हळद यांचे मिश्रण लावावे.तोंडात जखमा झाल्यामुळे जनावरास मौ हिरवे कोवळे गावात खाण्यास द्यावे. पायाच्या जखमा पोटयाशियम पर्मागनेट च्या द्रावणाने धुवावेत , जखमेवर टरपेंनटाईन टाकून अळ्या काढून टाकाव्यात व नंतर कार्बोलीक असिड पदर टाकावी .यासाठी बाजारात अनेक औषधी मलम उपलब्ध आहेत .

 दुय्यम  रोगाचा प्रादुर्भाव टाळावा यासाठी पशूवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानेच प्रतिजैविके व इतर औषधोपचार करू घ्यावा.

प्रतिबंधात्मक उपाय:-

वासरांनाजन्मल्यानंतर४५दिवसांनी व नंतर २.५ महिन्यांनी आणि तेथून पुढे दर सहा महिन्यांनी लसीकरण करावे.. म्हणजेच वर्षातून दोनदा-सप्टेंबर –ऑक्टोबर व्मारच – एप्रिल मध्ये लसीकरण करून घ्यावे. गाभण जनावरांना शेवटच्या काळात लस टोचू नये. या रोगाची बाधा झालेल्या माद्यांना त्यांची वासरे दुध पाजू नयेत. बाधीत जनावरांना चारू कुरणात चारू नये. बाधीत जनावरे वेगळी बांधावीत व त्यांची निगा वेगळ्या मजुराकडून करून घ्यावी.

 या रोग्याच्या उपचारापेक्षा प्रतिबंध केंव्हाही चांगला. या रोगाचे महत्व लक्षात घेऊन शासनाने आता जनावरांचे बाजार, साखर कारखाने आदी ठिकाणी रोग प्रतिबंधात्मक लसीकरण अनिवार्य केले आहे. यासाठी सर्व पशु पालकांनी जागरूक राहून आपल्या सर्व जनावरांना लसीकरण करून घ्यावे. रोग झाल्यानंतर पळापळ करणे म्हणजे तहान लागल्यावर विहीर खोदणे होय. त्यामुळे आपण आपले गाव ,तालुका , जिल्हा, राज्य व देश लाळ्या खुरुकुत मुक्त करण्याचा संकल्प करुयात.

                            

Related posts

पंढरपूर येथील श्री रुक्मिणीमातेची सरस्वतीच्या रुपात पुजा

चांगले उत्पादन मिळविण्यासाठी पेरणी सुक्षेत्रात हवी

कर्णेश्वरांचा किरणोत्सव !

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More