गारगोटी येथील अक्षरसागर साहित्य मंचाचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार आज जाहीर करण्यात आले. यामध्ये शिक्षणतज्ञ प्राचार्य डाॅ. मा. गो. माळी यांना भुदरगड साहित्य भुषण – 2020 पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
गारगोटी (ता. भुदरगड, जि. कोल्हापूर ) येथील अक्षरसागर साहित्य मंचच्यावतीने 2020 मधील राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले. जागतिक मराठी दिनाचे औचित्य साधून हे साहित्य पुरस्कार मंचाचे अध्यक्ष राजन कोनवडेकर व उपाध्यक्ष डाॅ. अर्जुन कुंभार यांनी आज जाहीर केले. या पुरस्कारांचे वितरण अक्षरसागर साहित्य मंचच्यावतीने १४ मार्च रोजी घेण्यात येणाऱ्या पहिल्या ग्रामीण साहित्य संमेलनात करण्यात येणार आहे.
शिक्षणतज्ञ प्राचार्य डाॅ. मा. गो. माळी यांना भुदरगड साहित्य भुषण – 2020 पुरस्काराने सन्मानित करणेत येणार अशीही माहिती मंचाच्या वतीने देण्यात आली. जाहीर करण्यात आलेले पुरस्कार असे –
डाॅ. म. गो. माळी संतोष जगताप (लोणविरे) रुस्तम होनाळे (नांदुरा) देवा झिंजाड (गारखिंडी, नगर) शिरीष देशमुख (मंगरूळ,जालना) नामदेव चव्हाण (सोलापूर)
उत्कृष्ट साहित्य पुरस्कार
1) संतोष जगताप (लोणविरे) – वीजेने चोरलेले दिवस (कादंबरी)
2) रुस्तम होनाळे (नांदुरा) – वऱ्हाडातली बिऱ्हाडं (कथासंग्रह)
3) देवा झिंजाड (गारखिंडी, नगर) – सगळं उलथवून टाकलं पाहिजे (कवितासंग्रह)
4) नामदेव चव्हाण (सोलापूर) – लदनी (आत्मकथन)
5) शिरीष देशमुख (मंगरूळ,जालना) – बारीक सारीक गोष्टी (बालकथा)
विशेष पुरस्कार असे –
6) श्रीराम पचिंद्रे – मृगजळ मागे पाणी
7) गुरुबाळ माळी – कोरोना अनलाॅक
8) डाॅ. चंद्रकांत पोतदार – सृजनगंध
9) शौकत नदाफ – आनंदचक्र
10) सुनील देसाई – सप्तपर्व
11) डाॅ. शिवाजी काळे – गावकुसातल्या गोष्टी
12) सुरेश सायत्री किसन धनवे – अस्वस्थ मनाचे बंड
13) प्रदीप देशमुख – गर गर भोवरा
14) सुभाषचंद्र जाधव – शहेनशहा ए मूसीकार नौशाद
15) व्ही.डी.पाटील – रमे तेथे मन
16) डाॅ. सतिशकुमार पाटील – A D H D एक भावविश्व
17) गोपाळ आवटी – सृजन संवाद
18) विजय वडवेराव – इजु
19) अमर मुसळे – अमरवेल