मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने ‘साहित्य चिंतन ‘घेऊन आले आहे. ई लिब. पुस्तकांची लायब्ररी. काय आहे ही ई लायब्ररी. त्यामध्ये कोणती पुस्तके आहेत. अगदी मोफत सहज वाजता येण्याजोगी. पुस्तक वाचल्याचा फिल देणारी हे अॅप जाणून घेण्यासाठी वाचा हा लेख…
चेतन अकर्ते
आजच्या धावपळीच्या जीवनात पुस्तकांपासून आपण तुटत चाललो आहोत. आपण सकाळपासुन रात्रीपर्यंत सारखे धावतच असतो. आजच्या या यांत्रिक जीवनामुळे आपल्या जीवनमूल्यात आलेल्या बदलांमुळे आपण वाचन संस्कृतीपासून दूर होत आहोत. मराठी भाषेचा सांस्कृतिक वारसा फार मोठा आहे.
पुस्तकांपासून वाचक दूर चाललायं…
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम ते अगदी साने गुरुजी, पु. ल. देशपांडे, शिवाजी सावंत, बाबासाहेब पुरंदरे, वि. स. खांडेकर, वि. वा. शिरवाडकर, रणजित देसाई, भालचंद्र नेमाडे अशा कितीतरी दिग्गज व्यक्तीमत्वांचा मराठी भाषेचा शृंगार करण्यात हातभार लाभलेला आहे. पण असे असूनही मराठी पुस्तकांना दर्जेदार वाचक का मिळत नाही ? का आज तो दूर जात आहे ? दूरचित्रवाणी संच, समाज माध्यमं आणि अति-तंत्रज्ञानाच्या आहारी जात असलेला आजचा समाज वास्तविक जगापासून तुटत चालला आहे. आणि हेच कारण आहे कि तो पुस्तकापासून वाचक दूर चालला आहे. अवांतर वाचनासाठी फार पुस्तके मिळत नाही. अशी पुस्तके असली, तरी मिळत नाहीत. कमी होत चाललेली वाचनालये, पुस्तक निर्मितीत येणारा मोठा खर्च यामूळे बाजारात नवीन पुस्तके उपलब्ध होत नाहीत, तसेच लॉकडाऊन काळात पुस्तक विक्री पूर्णपणे ठप्प झाली. अशा विविध कारणांनी पुस्तकांपासून आपण दूर जात आहोत.
ई बुकचा पर्याय
मोबाइल फोनच्या स्मार्ट शोधानंतर माणसाचे पुस्तकांशी असलेले उरलेसुरले नातेही तुटत चालले आहे. असे लोक म्हणतात. हे कितपत योग्य आहे ? “परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे” वेळेनुसार, परिस्थितीनुसार स्वता:मध्ये परिवर्तन करून घेणे, बदल करून घेणे हा एक सृष्टीचा जुना आणि महत्वाचा नियम आहे. या नियमाची तर आपणा सर्वांना माहीती आहेच. मग का नाही याच मोबाईल फोनचा वापर करून आपण वाचकांना पुस्तकांशी जोडायचे ? भाषेच्या संवर्धनासाठीही पुस्तक वाचन महत्त्वाचे आहे आणि मुलांना पुन्हा वाचनाकडे वळवण्यासाठी ई-बुक खरेतर योग्य पर्याय आहे.
ई लिब आहे तरी काय ?
याच अनुषंगाने आणि मराठी भाषा दिनाच्या औचीत्यावर आज आम्ही आपली ओळख करून देतोय ‘ईलिब’ शी. ईलिब आहे भारताची आपली पॉकेट ई लायब्ररी, म्हणजेच तुमचे पुस्तकल तुमच्या खिशात. सध्या ‘ईलिब’ हे बीटा वर्जन मध्ये आहे म्हणजे यावर कामं सुरु आहे. तुम्हाला नवनवीन पुस्तके रोज मिळत राहणार आणि नवीन पुस्तकांचे नोटीफीकेशन पण मिळत राहणार. तुम्ही ईलिबला गुगल प्ले स्टोरवरून मोफत तुमच्या एंड्राइड मोबाईलवर घेऊ शकता. डाउनलोड करायला ही लिंक वापरा –
https://play.google.com/store/apps/details?id=com.sachi.ebook_reader
‘ईलिब’ मध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या पुस्तकांना बुकशेल्फला टाकू शकता आणि परत जेव्हा पुस्तक वाचणार तर जुन्याच पानावर जाण्याची सोय बुकशेल्फला असलेल्या पुस्तकांना उपलब्ध आहे. पुस्तकांचे प्रमाणे तुम्ही पानें पालटू शकता, शब्दांचा आकार कमी अधिक करू शकता तसेच पृष्ठभागाचा रंग सुद्धा बदलू शकता. तर नक्की डाऊनलोड करून वाचन सुरु करा.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.