रानभाजी कर्टुली (फागला)
शास्त्रीय नाव: Momordica diocia
स्थानिक नाव : करटोली, कटुले, कर्टुली (फागला)
वेल वर्गीय रानभाजी, पिवळी फुले येतात आणि पावसाळ्यात रानात याची लागवड केली जाते.
उपयोगी भाग : फळ
औषधी उपयोग : इंफेक्शनचा धोका, बद्धकोष्ठता, पोटाजवळील चरबी कमी करण्यासाठी मदत होते.
करटोलीची भाजी करायची कशी अर्थात पाककृती :
- कटुले स्वच्छ धुवून व्हायचे. त्याचे बारीक काप करायचे ( कारल्याच्या भाजी प्रमाणे). काप मधला गर काढून टाकायचं.
- कढई मध्ये 2 चमचे तेल टाकायचे, त्यात हिंग, जीरा, मोहरी, कढीपत्ता टाकायचं.
- फोडणी झाली की त्यात कटुले चे काप टाकायचे आणि एकजीव करायचा
- यामध्ये लाल मिरची पावडर, चावी प्रमाणे मीठ आणि थोडी साखर घालायची. भाजी एकजीव करून घायची.
- पाच मिनिटे भाजी शिजली की त्यात कोतिंबिर आणि शेवटी खोबरं मिसळायचे.
- पाच ते दहा मिनिटे शिजवून झाली की भाजी तयार.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.