पुणे – दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कविकट्टामध्ये कविता सादरीकरणासाठी आवाहन करण्यात आले आहे. कवींनी त्यांच्या स्वरचित कविता ३० नोव्हेबरपर्यंत पाठवाव्यात, अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. उषा तांबे व सदस्य राजन लाखे यांनी दिली आहे.
दिल्ली येथे २१, २२, २३ फेब्रुवारी २०२५ या तीन दिवसांत ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनात ‘कविकट्टा’ या व्यासपीठावर कवींना कविता सादर करण्याची संधी देण्यात येते. यासाठी एक स्वरचित कविता संयोजकांच्यावतीने मागवण्यात येत आहे. ही कविता २० ओळींपेक्षा मोठी नसावी. कविता स्वरचित असावी. गझलसहित कवितेचे सर्व प्रकार यामध्ये समाविष्ट असतील. ही कविता युनिकोडमध्ये kavikattadelhi98@sarhad.in या ईमेलवर पाठवावी. तसेच कवितेखाली स्वतःचे नाव, गाव, पूर्ण पत्ता, दूरध्वनी क्रमांक (व्हॉटस्अॅप) लिहावा. एकापेक्षा जास्त कविता पाठवल्यास सर्वच कविता बाद ठरविण्यात येईल. याची नोंद घ्यावी. कविता पोस्टाने पाठवताना ती टाईप केलेली असावी. पाकिटावर ‘कविकट्टा दिल्ली’ असा स्पष्ट उल्लेख करावा. निवड झालेल्या कवींना दिल्ली येथे सादरीकरणानंतर प्रमाणपत्र सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येते. ११) कविता स्वीकारण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२४ सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत आहे.
कविता पोस्टाने पाठविण्याच पत्ता :
गोपाळ कृष्ण गोखले प्रबोधिनी, सरहद पब्लिक स्कूल, स. नं. ६, धनकवडी, पुणे ४११०४३.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.