- कोकणातील साहित्यिकांसाठी वाङ्मय पुरस्कार योजना
- प्रथम श्रेणीच्या सात पुरस्कारांना प्रत्येक पाच हजार रुपये
- कादंबरी, कथा कविता, समीक्षा ललित गद्य चरित्र – आत्मचरित्र, चित्रपट विषयक पुस्तकांचा पुरस्कारासाठी समावेश
कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे कोकणातील सभासद साहित्यिकांना विविध वाङमय पुरस्कार प्रतिवर्षी दिले जातात. जानेवारी २०२२ मध्ये घोषित होणाऱ्या वाङमयीन पुरस्कारांसाठी लेखकांकडून पुस्तके मागविण्यात येत आहेत. हे सर्व पुरस्कार कोमसापच्या कोकणातील सभासद असणाऱ्या कवी व लेखकांसाठी दिले जातात. प्रथम श्रेणीचे सात पुरस्कार, प्रत्येकी पाच हजार रुपये सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे आहेत. कादंबरी, कथा कविता, समीक्षा ललित गद्य चरित्र – आत्मचरित्र, चित्रपट विषयक पुस्तकाकरिता पुरस्कार दिले जातील.
र. वा. दिघे कादंबरी पुरस्कार, वि. सी. गुर्जर कथासंग्रह पुरस्कार, आरती प्रभु कविता संग्रह पुरस्कार, अनंत काणेकर ललित गद्य पुरस्कार, प्रभाकर पाध्ये समीक्षक पुरस्कार, धनंजय कीर चरित्र पुरस्कार, भाई भगत चित्रपट, नाट्यविषयक पुरस्काराचा समावेश आहे. लक्ष्मीबाई व न्यायमूर्ती राजाभाऊ गवांदे ललित गद्य पुरस्कारासाठी गोवा, कारवार बेळगाव या प्रदेशातील लेखकांचा ही विचार केला जाईल. विशेष पुरस्कार प्रत्येकी तीन हजार रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे सात प्रकार असून त्यामध्ये कादंबरी, कथा कविता, बालवाङ्मय, संकीर्ण गद्य, नाटक, एकांकिका विद्याधर भागवत कथा संग्रह पुरस्कार, वसंत सावंत कविता संग्रह पुरस्कार, श्रीकांत शेट्ये चरित्र, आत्मचरित्र पुरस्कार, प्र. श्री. नेरूरकर बालवाड्मय पुरस्कार, वि. कृ. नेरूरकर संकीर्ण वाङमय पुरस्कार, अरुण आठल्ये संकीर्ण पुरस्कार, रमेश कीर नाटक, एकांकिका पुरस्कार, वैचारिक साहित्यासाठी फादर स्टीफन सुवार्ता (वसई पुरस्कार) आहेत.
पुरस्कारासाठी पुस्तकाच्या दोन प्रती स्पीड पोस्ट अथवा कुरियरने निमंत्रक प्रा. अशोक ठाकूर, द्वारा सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, पालघर, ता. जि. पालघर ४०१४०४ यांच्याकडे पाठवाव्यात.
लेखक, कवी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कार्यक्षेत्रातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, मुंबई, नवी मुंबई या जिल्ह्यातील असावा. कोकण मराठी साहित्य परिषदेचा तो आजीव सभासद असणे आवश्यक आहे. तशा प्रकारचे कोमसापचे जिल्हाध्यक्ष अथवा शाखा अध्यक्ष यांचे प्रमाणपत्र किंवा सभासद पावतीची छायाचित्र प्रत जोडणे आवश्यक आहे. पुस्तके ११ एप्रिल २०१९ ते ते ३१ मार्च २०२० व १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ या दोन वर्षात प्रकाशित झालेली असावीत.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.