March 29, 2024
Folksong Bhet by Vilas Kulkarni
Home » लोकगीत – भेट
कविता

लोकगीत – भेट

लोकगीत – भेट

उभं राहून अपक्ष हमखास मिळव तिकीट
मागणी घालून थेट माझ्या बाबांना तू भेट

पायलीला या पन्नास उभे लायनीत उमेदवार
नाही चालणार थेर माझ्या हुकुमाचे ताबेदार
भले भले पैलवान होतील चारीमुंड्या चीत
मागणी घालून थेट माझ्या बाबांना तू भेट

मागं मागं माझ्या फिरतोय धरणीचा अक्ष 
मी बोलेल तीच पूर्व दिशा सांगेल तोच पक्ष
गपगुमान सांगते ते ऐक वागावे आता नीट
मागणी घालून थेट माझ्या बाबांना तू भेट

सांग कुणा आवडेल असा उमेदवार पडेल
ताठ राहू दे मान मग इतिहास नवा घडेल
ठेवून टोपी शाबूत हिकमतीने लावावे नेट
मागणी घालून थेट माझ्या बाबांना तू भेट

विलास कुलकर्णी
मीरा रोड

Related posts

जीवनात दुरदृष्टी ठेवून नियोजन हवे

अक्षरसागरचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर

नर्सरी आणलेली रोपे जगत नाहीत ? यावर उपाय…

Leave a Comment