मारोतराव नारायणे राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कारासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन
वर्धा – मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने मराठीतील साहित्यिकांच्या दर्जेदार साहित्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. कवितासंग्रह, कादंबरी, कथासंग्रह, वैचारिक साहित्य या प्रकारातील साहित्यकृतींना मारोतराव नारायणे राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती प्रा. डॉ. प्रमोद नारायणे यांनी दिली आहे.
चारही साहित्य प्रकारात प्रत्येकी ७,००० रूपये रोख, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. १ जानेवारी २०२४ ते २० फेब्रुवारी २०२५ या काळात प्रकाशित झालेले कवितासंग्रह / कादंबरी/ कथासंग्रह / वैचारिक साहित्य पुरस्कारासाठी विचारात घेतले जाणार आहे. तरी पुस्तकाच्या तीन प्रती प्रा. डॉ. प्रमोद नारायणे, अध्यक्ष, मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठान, शाहू ले आऊट, प्रियदर्शिनी महिला महाविद्यालयाजवळ, वर्धा ४४२००१ मोबाईल ९८५०३०९६६५ या पत्त्यावर २७ फेब्रुवारी २०२५ पर्यंत पाठवाव्या असे आवाहन करण्यात आले आहे.
२७ मार्च २०२५ रोजी या पुरस्कारांची घोषणा करण्यात येणार असून २७ एप्रिल २०२५ रोजी मारोतराव नारायणे यांच्या स्मृतिदिनानिमित्य वर्धा येथे आयोजित कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण होईल. तरी या पुरस्कारांसाठी जास्तीत जास्त साहित्यिकांनी आपले साहित्य पाठवावे, असे आवाहन मारोतराव नारायणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. डॉ. प्रमोद नारायणे, वर्धा ९८५०३०९६६५, सचिव हेमलता नारायणे, वर्धा ९०११८७८४८९, पुरस्कार संयोजन समिती सदस्य श्रीकांत पेटकर, कल्याण ९७६९२१३९१३, किशोर पेटकर, नागपूर ८८०६२४७६८६ डॉ. संदीप भेले, बदलापूर ९८८१४२२४५३, सूर्यकांत पाटील, वरोरा ९४२२१९१५२४ यांनी केले आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.