नाही हरायचे.….
आलो तसा मज । नाही मरायचे ।
नाही हरायचे । समस्यांना ।।
काय म्हणतील । कोण आपल्यास ।
विसरणे यास । मज आहे ।।
म्हणणारे तर । काहीही म्हणेल ।
आपल्या हसेल । प्रयत्नास ।।
मग काय आता । प्रयत्न सोडावे ।
जीवन जगावे । मृत्यूसम ? ।।
दुर्जन हसेल । त्यांना हसू देणे ।
काय त्रास घेणे । बिनकामी ? ।।
सज्जनांची साथ । हवी आहे फक्त ।
बनेल सशक्त । त्यांच्यामुळे ।।
नराधमांमुळे । क्षय कर्तव्याचा ।
नाही जगण्याचा । यात मार्ग ।।
अशा माणसांची । सावलीही नको ।
कदापिही नको । त्यांची साथ ।।
देशासाठी कर्म । चांगले करणे ।
हसत मरणे । अंतःकाळी ।।
नाही मनामध्ये । विकार पाळणे ।
विचार करणे । निर्मळची ।।
अजुला अज्ञान । दूर सारायचे ।
आहे जिंकायचे । निश्चितच ।।
कवी – अजय रमेश चव्हाण,
तरनोळी, ता. दारव्हा, जि.यवतमाळ
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.