March 1, 2024
words-limit-poem-by-bhavana-ramteke
Home » शब्दाची मर्यादा
कविता

शब्दाची मर्यादा

शब्दाची मर्यादा

नसतात शब्दास मर्यादा
परंतु वापरण्यास आहे।
कुणाचे मन दुखवू नये
म्हणून शब्द जपणे आहे।।

आदराचे शब्द घडविते
संस्कार लहानमोठ्यावर।
मर्यादेच्या बाहेरील शब्द
आघात करती मनावर।।

महत्व अर्थपूर्ण शब्दांना
वायफळ शब्द टाळायचे।
वेळेचे भान ठेवून जसे
शब्दांची मांडणी करायचे।।

असतात काही शब्द जसे
ऐकता मनास झोंबणारे।
काही शब्द मात्र गोड असे
सतत ऐकावे वाटणारे।।

शब्दानीच कळते भावना
एकदुसऱ्याच्या मनातील।
शब्दांना सजवून बोलता
प्रेम वाढते आपसातील।।

भावना रामटेके, गडचिरोली

Related posts

सूत्रकृमीचा प्रादुर्भाव जाणून त्वरित करा उपाययोजना

अनुभुतीचा विस्तार करणारी आजची कविता

ज्ञान पक्व झाले तरच अज्ञान दूर होईल

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More