July 27, 2024
New Equipment for farmers by Rahuri University
Home » जाणून घ्या नवनवी अवजारे
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

जाणून घ्या नवनवी अवजारे

जाणून घ्या नवनवी अवजारे


शेवगा काढणी झेला

अनेक शेतकरी शेवग्याच्या शेतीची लागवड करतात. त्यांना शेंगा काढणे सोपे जावे व मालाची प्रतही राखता यावी यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने मनुष्यचलित काढणी झेला विकसित केला आहे.

शेवगा काढणी झेला
Drumstick harvesting Zhela

अवजाराची वैशिष्ट्ये :

  • एका तासात २५० ते २८० शेंगा काढता येतात.
  • शेंगाला इजा होत नसल्याने मालाची प्रत राखली जाते.

पीव्हीसी भात लावणी चौकट

भात पिकाच्या चारसूत्री लागवड तंत्रज्ञानांतर्गत, पुनर्लागवड (१५ सेंमी X २५ सेंमी अंतरावर) व क्रिकेट खते वापरण्याची सुलभता (६५५०० प्रति हेक्टर) आणि अधिक उत्पादनासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने १.२० मीटर X ०.४० मीटर आकाराच्या फुले पीव्हीसी भात लावणी चौकटीची शिफारस केली आहे.

अवजाराची वैशिष्ट्ये :

  • चारसूत्री तंत्रज्ञानातील १५ सेंमी X २५ सेंमी अंतरावर पुन करणे सोईचे होते.
  • ब्रिकेट खतांचा वापर सुलभतेने करता येतो..
  • नेहमीच्या पद्धतीपेक्षा ५ ते ६ मजूर प्रतिहेक्टरी बचत होते व उत्पादनात ३० ते ३५ टक्के वाढ होते.
  • शेतकऱ्यांना वापरण्यास सोपी, हलकी व कमी खर्चाची आहे.

मानवचलित ज्वारी काढणी यंत्र

मुळासहित ज्वारी काढण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने मानवचलित ज्वारी काढणी यंत्र विकसित केले आहे.

ज्वारी काढणी यंत्र
ज्वारी काढणी यंत्र

अवजाराची वैशिष्ट्ये :

  • बागायती तसेच कोरडवाहू ज्वारी मुळासहित काढण्यासाठी उपयुक्त.
  • हाताने ज्वारी मुळासह उपटून काढण्यापेक्षा कमी कष्टात ज्वारी काढता येते.
  • वजनाला हलके (२.१ कि.ग्रॅ.) असल्याने उचलून नेण्यास सोपे.

प्रा. टी. बी. बास्टेवाड, डॉ. पी. ए. तुरबतमठ, आर. के. राठोड


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

ऑनलाईन सेवा घेत आहात, तर मग हे आवश्यकच…

Saloni Art : टाकावू कार्डबोर्डपासून नेमप्लेट…

Navratri Biodiversity Theme : राखाडी रंगातील जैवविविधतेची छटा…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading