May 19, 2024
Vi S Khandekar literature award by Damasa
Home » ‘दमसा’ तर्फे यावर्षीपासून २५ हजारांचा वि. स. खांडेकर राज्यस्तरीय पुरस्कार
काय चाललयं अवतीभवती

‘दमसा’ तर्फे यावर्षीपासून २५ हजारांचा वि. स. खांडेकर राज्यस्तरीय पुरस्कार

‘दमसा’ तर्फे यावर्षीपासून २५ हजारांचा वि. स. खांडेकर पुरस्कार

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने राज्यस्तरीय वि. स. खांडेकर पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाच्या दोन प्रती पाठवावयाच्या आहेत, अशी माहिती सभेच्यावतीने देण्यात आली आहे.

सातारा येथील कवयित्री डॉ. रामकली पावसकर यांच्यावतीने त्यांचे वडील प्रा. मनोहर कोपर्डे यांच्या स्मरणार्थ वि. स. खांडेकर पुरस्कार देण्यात येणार आहे. पंचवीस हजार रुपये, गौरवचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

कथा, कादंबरी, ललित आणि आत्मचरित्र या चार वाङ्मय प्रकारांपैकी कोणत्याही एका उत्कृष्ट पुस्तकासाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे. या चार प्रकारातील पुस्तकच पुरस्कारासाठी पात्र असेल. पुस्तकाच्या दोन प्रती ३० एप्रिल, २०२४ पर्यंत दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या पत्त्यावर पाठवाव्यात. असे आवाहन साहित्य सभेच्या वतीने करण्यात आले आहे.

पुस्तके पाठविण्याचा पत्ता :
कार्यवाह, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, जी ६, स्मृती अपार्टमेंटस, बाबूजमाल दर्ग्याजवळ, गंगावेश, कोल्हापूर – ४१६०१२ अधिक माहितीसाठी संपर्क : ९८५०४३३८०७

Related posts

मायक्रोग्रीन्स कमीत कमी भांडवलात करता येणारा उद्योग

सत्याने संशयावर करा मात

जलक्रांती केव्हा…?

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406