March 29, 2024
niket-pawaskar-message-letters-exhibition-in-dadar-post-office
Home » निकेतचा संदेश पत्र संग्रह हा दुर्मीळ खजिना – विलास गुर्जर
काय चाललयं अवतीभवती

निकेतचा संदेश पत्र संग्रह हा दुर्मीळ खजिना – विलास गुर्जर

दादर : निकेतच्या संदेश पत्र संग्रहातील हा खजिना दुर्मीळ आहे. प्रत्येकाने त्यातील सगळी पत्र वाचली पाहिजेत. हा अमुल्य ठेवा वर्षानुवर्षे काम केल्यानंतर अथक परिश्रमाने जमा झालेला आहे. विशेष म्हणजे या संग्रहाच्या निमित्ताने अनेक दिग्गज व्यक्तींना निकेतने एकत्र आणले आहे. अशा दुर्मीळ खजिन्याचा सर्वांनी आनंद घ्या, असे प्रतिपादन ज्येष्ठ नाट्य कलावंत विलास गुर्जर यांनी काढले.

दादर येथील मुख्य टपाल कार्यालयात आयोजित केलेल्या वार्षिक सत्यनारायण महापुजेनिमीत्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे येथील संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांच्या “अक्षरोत्सव” या आगळ्यावेगळ्या छंदाचे प्रदर्शन आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते.

निकेत पावसकर यांचे प्रदर्शन पाहून भारावू गेलो.अनेक दिग्गज मान्यवरांच्या शुभेच्छा, स्वाक्षरी, हस्ताक्षरं मिळवणं हे खूप कठीण कार्य निकेतने त्याच्या सुस्वभावामुळेच अगदी सहज केलंय . हा आपलेपणा त्याने आत्मियतेने जतन करून ठेवला आहे.
मधु खामकर

ज्येष्ठ शाहीर, मुंबई

या प्रदर्शनाला विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. मुंबई येथे प्रथमच संपन्न झालेल्या या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनाचे उद्घाटन सिनियर पोस्ट मास्तर सुभाष परब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपपोस्ट मास्तर सुतार, असिस्टंट पोस्ट मास्तर देसाई, जनसंपर्क अधिकारी विलास चौकेकर, पुजा समिती अध्यक्ष स्नेहल काटे, सचिव मंगेश शेट्ये, खजिनदार शशिकांत पालकर यांच्यासह पोस्ट कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते. 

राज्य व राष्ट्र यांच्या सीमा ओलांडून जागतिक स्तरावरील विशेष वलयंकित मान्यवरांचे अक्षर, संदेश आणि स्वाक्षरी यांचा त्यांच्या छायाचित्रांसह जो आनंद मेळावा भरविण्याचा अव्दितिय छंद निकेतने जोपासलाय. यातून या सर्व मान्यवरांचे विराट दर्शन घडविल्याबद्दल शतशः आभार.
भाऊराव घाडीगांवकर

मोडी लीपि प्रशिक्षक, मुंबई

दादर मुख्य पोस्ट कार्यालयामध्ये आयोजित केलेल्या या प्रदर्शनामध्ये देश विदेशातील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या हस्ताक्षरातील संदेश पत्रांचा समावेश होता. संपुर्ण दिवस चाललेल्या या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

आजच्या डिजिटल युगात भाषा लीपि नष्ट होतील की काय असे वाटणाऱ्या वातावरणात निकेत पावसकरचा हा छंद निश्चितच दिलासा देणारा आहे. यासाठी एका तपाहून अधिक काळ त्याने परिश्रम घेतले आहेत, याचे कौतुक वाटते.
राजश्री ठाकुर

एम.बी.बी.एस. मुंबई

या संग्रहाला सुप्रसिध्द ढोलकी सम्राट विजय चव्हाण, लेखक अभिनेते दिग्दर्शक निनाद शेट्ये, अभिनेते- फणी आणि गाणीचे निर्माते शशिकांत खानविलकर, कलाकार राजू मोरे, कला दिग्दर्शक सुमित पाटिल, मुंबई जोगेश्वरीचे नगरसेवक बाळा नर, माजी नगरसेवक सुनिल मोरे, ज्येष्ठ शाहीर मधु खामकर, ज्येष्ठ लोककला अभ्यासक सदानंद राणे, शाहीर दत्ताराम म्हात्रे, वक्ते लेखक जोसेफ तुस्कानो, माजी राज्यपाल यांचे सहसचिव प्रा. विनायक दळवी, वामनदादा कर्डक अध्यासनाचे प्रमुख प्रा. विजयकुमार पाईकराव, संग्राहक राजा जाधव, उल्हास चौगले, राजेंद्र पाटकर, सतिश भिडे, मोडी भाषा अभ्यासक बाबुराव घाडीगावकर, अरविंद कटकधोंड, सायरस सिधवा, आंतरराष्ट्रीय चित्रकार किशोर नादावडेकर, मराठी वृत्तपत्र लेखक संघ जिल्हाध्यक्ष रविंद्र मालुसरे, पत्रकार आणि कलाकार नन्दु पाटिल, मुंबई महालक्ष्मी ट्रस्टचे सल्लागार विजय घरत, समाजसेवक सत्यवान नर, साळिस्ते ग्रमोत्कर्ष मँड़ळ मुंबईचे पदाधिकारी सुहास पांचाळ, सदानंद नारकर, हनुमंत ताम्हणकर, सुधाकर नर, दीपक रांबाडे, कोकण सर्च इंजिनचे संस्थापक सुशांत लांबे, वैभव लांबे, गीतकार संगीतकार प्रणय शेट्ये आदी मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. 

यावेळी विजय चव्हाण, निनाद शेट्ये, शाहीर मधु खामकर, शशिकांत खानविलकर यांनी मनोगत व्यक्त केले. तर निकेत पावसकर यांनी आपल्या या वाटचालीबाबत मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन विलास चौकेकर यांनी केले.

Leave a Comment