कांदा व लसूण संशोधन संचालनालय, पुणे यांच्या सौजन्याने…
कांदा काढणी व काढणी पश्चात नियोजन
पुर्नलागवडीच्या साधारणता १०० ते १२० दिवसांमध्ये कांदा पीक काढणी करिता तयार होते.
५० टक्क्याहून अधिक पिकांच्या माना पडणे ही कांदा पीक परिपक्वतेची अवस्था मानली जाते.
कांदे काढणी नंतर मानेसकट शेतात तीन ते चार दिवस सुकवावेत.
तसेच चांगले सुकलेले कांदे दोन ते तीन सेंटी मीटर देठ ठेवून कापावेत.
त्यानंतर कांद्याची प्रतवारी करून ते सावली मध्ये दहा ते पंधरा दिवस अरण लावून सुकवावेत.
सावलीतील सुकवणी मुळे कांद्याच्या वरील पापुद्रयातील आर्द्रता कमी होऊन उत्तम रंग तसेच साठवण क्षमता वाढते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.