कोल्हापूर – शहरात 24 व 25 ऑगस्ट 2024 रोजी रानभाज्या उत्सव आयोजित केला असल्याची माहिती निसर्ग अंकुरचे अध्यक्ष डॉ. मधुकर बाचुळकर यांनी दिली.
रानभाज्या उत्सवामध्ये सुमारे 160 हून अधिक रानभाज्यांचे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. या सर्व रानभाज्यांची कुंड्यांमध्ये लागवड केलेली आहे. या भाज्यांची ओळख व त्यांचे आहारातील महत्त्व याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा महोत्सव दरवर्षी भरविण्यात येतो. यंदा हा महोत्सव दसरा चौकातील जैन बोर्डिंगच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. सकाळी दहा ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहाणार आहे.
या उत्सवात रानभाज्यांच्या पाककृती स्पर्धा ही आयोजित करण्यात आल्या आहेत. रानभाज्यांपासून बनविलेले विविध खाद्यपदार्थ , रानभाज्या, आणि रानभाज्यांची रोपे व रानभाज्यांची पुस्तकेही या उत्सवात विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. हा उत्सव व उपक्रम सर्वांसाठी विनामुल्य खुला आहे. पाककृती स्पर्धा २५ ऑगस्ट रोजी दुपारी साडे बारा वाजता होणार असून यामध्ये सहभागासाठी मंजिरी कपडेकर ( मोबाईल – 9373319495 ) व ऐश्वर्या कपडेकर ( मोबाईल – 7620619495 ) यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन श्री. बाचुळकर यांनी केले आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.