डॉ. विठ्ठल जाधव यांचा ‘रानरांगूळ’ कथासंग्रह प्रकाशित झाला आहे. मातीचे दुःख आणि वेदना साहित्याच्या माध्यमातून ते मांडतात. शेती, शेतकरी यांची स्थिती फारशी सुधारली नाही. ही खंत व्यक्त करून ‘रानरांगूळ’ कथेमधून शेतीचे प्रश्न उपस्थित केले आहेत.
प्रा. डॉ. भाऊसाहेब नटके
संतपीठ, पैठण
बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे. त्यातून मार्ग काढणारा तरुण फसतो. हे वर्णन ‘काळीपिवळी’ कथेतू येते. वाहन घेणे‚ कर्जबाजारी होणे‚ ते चालवणे. तर सरकारी नोकरी नाही. हाताला काम नाही. मुलींची संख्या कमी झालेली आहे. शेकडो लग्नाळू मुले गावात दिसतात. लेखकाच्या मनातील प्रश्न कथेतून येतो. तरूण दुकान सुरू करतो. लग्न झाले की दुकान मोडतो. दुकानाचे भाडे देणे परवडत नाही. वास्तव मांडणारी कथा नवीन प्रश्नांची उकल करते. बबन तात्याचं गावातलं दुकान आणि मुलगा यांचे प्रसंग. दुसराच कर्तृत्ववान संजू प्रगती करतो. ज्यांना अनुकूल वातावरण मिळते. त्याची प्रगती होत नाही. जो प्रतिकूल परिस्थितीत मार्ग काढतो. तो जीवनात यशस्वी होतो. हे सांगणारी ‘पत्तरवाळी’ ही कथा.
भारतात महाराष्ट्र हा आघाडीवर असणारा प्रदेश. शेतकरी आत्महत्या घडत असताना ऊसाचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. कारखान्याला ऊस न्यायचा असेल तर कारखान्याची जवळीक लागते. मजुरीचे वाढलेले दर, वाहतूक यात हतबल झालेला ऊस बागायतदार, चिरडला जातो. एकतर खते, बी-बियाणे, मशागत आणि तोडीचा खर्चाचा मेळ जुळत नाही. जास्त काळाच्या ऊसास पांढरे तुर्रे फुटतात. कारखाना ऊस नेत नाही. डॉ. विठ्ठल जाधव यांच्या ‘जळीत’ या कथेतील नायक हा जळालेल्या ऊसाच्या पाचटामध्ये स्वतःला जाळून घेतो. ही सत्यघटना कथेतून मांडली आहे. सर्वच कथांतून हृदयस्पर्शी निवेदन, पात्र, प्रसंग आणि घटना यांचा मेळ साधला आहे.
गरीब आणि श्रीमंत मुलांमधील द्वंद्व ‘चिमुकाटा’ या कथेमध्ये येते. गुरूजींची ‘हंटरकाठी’ तर म्हैस विकणे आहे! ही विनोदी ढंगातील कथा. लळा, सीएचबी, डीम-फूल, तंदूररोटी, गाव अक्की, कोरोनातील भ्यापान या कथा भूमीनिष्ठेचे मार्दव मांडतात.
पुस्तकाचे नाव – रानरांगूळ (कथासंग्रह)
लेखक – डॉ. विठ्ठल जाधव
प्रकाशक – स्टोरीमिरर, मुंबई
पृष्ठ; १३० मूल्य; २१० रु.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.