१८डिसेंबर रोजी पुरस्कार प्रदान समारंभ
कोल्हापूर – दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने कवी धम्मपाल रत्नाकर यांच्या स्मृत्यर्थ देण्यात येणाऱ्या २०२३ या वर्षातील राज्यस्तरीय रत्नाकर काव्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये अनिल धाकू कांबळी ( कणकवली ) यांच्या ‘ इष्टक , तर ऐश्वर्य पाटेकर ( नाशिक) यांच्या ‘कासरा’ या संग्रहांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून पुरस्कार प्रदान समारंभ १८ डिसेंबर,२०२४ रोजी होणार आहे.
पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी पाच हजार रुपये, गौरवचिन्ह आणि प्रमाणपत्र असे आहे. पुरस्कार निवडीसाठी परीक्षक म्हणून ज्येष्ठ समीक्षक प्रा. अविनाश सप्रे, ज्येष्ठ कवी भीमराव धुळुबुळू यांनी काम पाहिले. पुरस्कार प्रदान समारंभ येत्या १८ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे होणार आहे.
धम्मपाल रत्नाकर काव्य पुरस्कार यापूर्वी श्रीधर नांदेडकर, श्रीकांत देशमुख, वीरधवल परब, कल्पना दुधाळ, संजीवनी तडेगावकर, अरुण इंगवले, पी. विठ्ठल, सुरेश सावंत, अजय कांडर, सारिका उबाळे, सुचिता खल्लाळ, पद्मरेखा धनकर, दीपक बोरगावे, कविता मुरूमकर, हबीब भंडारे, गोविंद काजरेकर, राजेंद्र दास, केशव देशमुख, कीर्ती पाटसकर आदींना देण्यात आला आहे. समारंभास साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन साहित्य सभेचे कार्याध्यक्ष दि. बा. पाटील, कार्यवाह डॉ. विनोद कांबळे यांनी केले आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.