कडा येथील साहित्यज्योती पुरस्कार जाहीर
कडा ( ता. आष्टी, जि. बीड) येथील साहित्यज्योती काव्य मंचाच्यावतीने कथा, कादंबरी, कवितासंग्रह या साहित्य प्रकारांना पुरस्कार देण्यात येतात. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त या राज्यस्तरीय साहित्यज्योती पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. या पुरस्कार निवड प्रक्रियेमध्ये डॉ जी पी बोडखे, डॉ. अभय शिंदे, हरिष हातवटे. माधव सावंत, इंद्रकुमार झांजे, संगिता होळकर, मधुचंद्र राऊत, वि. भा. साळुंखे, दिनेश पोकळे, संदिप पाचारणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले, अशी माहिती नागेश शेलार यांनी दिली आहे. यावेळी २०१९, २०२०, २०२१ असे तीन वर्षांचे विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
जाहीर झालेले पुरस्कार असे –
पुरस्कार सन २०१९
कविता संग्रह –
माती शाबूत राहावी म्हणून.. – विरेंद्र मिरेवाड (नांदेड)
माझ्या हयातीचा दाखला – डॉ. विशाल इंगोले (बुलडाणा)
कथा संग्रह –
वाताहत” – डॉ. अनंता सुर (चंद्रपूर),
परतीचा पाऊस – यशवंत माळी ( सांगली )
कादंबरी –
पिपिलीका मुक्तिधाम – डॉ. बाळासाहेब लबडे (रत्नागिरी)
पुरस्कार सन २०२०
कविता संग्रह
तुकोबाच्या कुळाचा वंश – संतोष कांबळे (मालेगाव)
चैत्रचाहूल – योगिता राजकर (सातारा)
कथा संग्रह
फिंट्री – सप्तर्षी माळी (नाशिक)
गावकुसाल्या गोष्टी – डॉ. शिवाजी काळे (अहमदनगर)
कादंबरी
फिरत्या चाकावरती – डॉ. बाबुराव उपाध्ये (श्रीरामपूर)
पुरस्कार सन २०२१
कविता संग्रह
आम्ही फुले बोलतोत – भारत सातपुते (लातूर)
निलमोहर – जयश्री वाघ (नाशिक)
कथा संग्रह
बाईचा दगड – डॉ. भास्कर बडे (बीड)
दमकोंडी – ज्योती सोनवणे ( छत्रपती संभाजीनगर)
कादंबरी
पाऊसकाळ – विजय जाधव (सांगली)