मूल नगरीत ३ डिसेंबरला साहित्यिकांची मांदियाळी
साहित्यिकांना प्रेरणा देत नवसाहित्याची निर्मिती व्हावी म्हणून झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर व झाडीबोली साहित्य मंडळ शाखा मूल यांच्यावतीने ३ डिसेंबर२०२३ ला बालविकास प्राथमिक शाळा मूल येथे पहिले राज्यस्तरीय महिला झाडीबोली साहित्य संमेलन आयोजित केलेले आहे . या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ कवयित्री शशिकला गावतुरे यांची निवड करण्यात आली आहे.
ज्येष्ठ साहित्यिक शशिकला गावतुरे यांची सावित्री ज्योतीची सावली, बालकाव्य कुंज व क्रांतीपर्व अशी ग्रंथसंपदा असून अनेक लेख व वैचारिक स्फुटलेखन प्रसिध्द आहेत. त्यांच्या साहित्य क्षेत्रातील कार्याबद्दल २००६ ला भाग्यश्री महिला नागरी पतसंस्था यांचा पुरस्कार, २००८ ला अखिल भारतीय सदधर्मसेवा संघ अमरावतीचा मानवता पुरस्कार, २०१० ला आदिवासी विकास मंडळाचा समाजसेवा पुरस्कार, २०१८ ला नगर परिषद मूल तर्फे पुरस्कार, २०१९ ला योग समितीच्या वतीने सत्कार, २०१९ ला नक्षत्राचं देणं काव्यमंच पुणेचा राज्यस्तरीय काव्यगौरव पुरस्कार, २०२० ला राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचा रा. ज. बोढेकर स्मृती साहित्य लेखन पुरस्कार यांसारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे .
साहित्य क्षेत्रातील करण्याबरोबरच सौ. गावतुरे यांचे सामाजिक कार्य मोठे आहे . २००२ पासून त्या बालसुसंस्कार केंद्र चालवतात . ग्रामगीतेच्या प्रचारासाठी श्री गुरुदेव सेवा मंडळ स्थापन केले. १९९६ पासून निःशुल्क वाचनालय , योग प्राणायम वर्ग व शिबिरे चालवतात . शिक्षणाच्या प्रसारासाठी स्वतःचे घर वसतिगृह म्हणून खुले करून दिले. व्यसनमुक्ती व अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अहोरात्र कार्य करतात .
पहिले राज्यस्तरीय महिला झाडीबोली साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून शशिकला गावतुरे यांची निवड झाल्याबद्दल संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रा. रत्नमाला भोयर , झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूरचे अध्यक्ष अरुण झगडकर , ज्येष्ठ मार्गदर्शक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर , सचिव लक्ष्मण खोब्रागडे , मूल शाखेचे अध्यक्ष सुखदेव चौथाले , वृंदा पगडपल्लीवार , सुनील बावणे , प्रभा चौथाले, नागेंद्र नेवारे , वर्षा भांडारवार , गणेश मांडवकर , विजय लाडेकर , नामदेव पीजदूरकर , परमानंद जेंगठे , पंडित लोंढे , प्रशांत भंडारे , रामकृष्ण चनकापुरे , सुनील पोटे , सुरेश डांगे , संतोष मेश्राम , मंगला गोंगले यांनी सभेचे आयोजन करून अभिनंदनाचा ठराव घेत पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले .
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.