मूल येथे पहिले राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलन
स्वागताध्यक्ष म्हणून प्रा. रत्नमालाताई भोयर यांची निवड
साहित्यिकांना प्रेरणा देत नवसाहित्याची निर्मिती व्हावी म्हणून प्रसिद्ध झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर व झाडीबोली साहित्य मंडळ शाखा मूल यांच्यावतीने ३ डिसेंबर२०२३ ला बालविकास प्राथमिक शाळा मूल येथे पहिले राज्यस्तरीय महिला झाडीबोली साहित्य संमेलन आयोजित केलेले आहे . या संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून कवयित्री प्रा. रत्नमालाताई भोयर , माजी नगराध्यक्ष नगर परिषद मूल तथा महिला अध्यक्ष झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर यांची निवड करण्यात आली आहे. प्रा. रत्नमाला भोयर यांचे सामाजिक व राजकीय क्षेत्रात भरीव कार्य असून त्यांची साहित्यिक म्हणून तीन कवितासंग्रह प्रकाशित झालेली आहेत . त्यांना विविध संस्थांमार्फत अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
पहिले राज्यस्तरीय महिला झाडीबोली साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून प्रा. रत्नमाला भोयर यांची निवड झाल्याबद्दल झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूरचे अध्यक्ष अरुण झगडकर, ज्येष्ठ मार्गदर्शक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, सचिव लक्ष्मण खोब्रागडे, मूल शाखेचे अध्यक्ष सुखदेव चौथाले , शशिकलाताई गावतुरे , वृंदा पगडपल्लीवार , सुनील बावणे , प्रभा चौथाले, नागेंद्र नेवारे , वर्षा भांडारवार , गणेश मांडवकर , विजय लाडेकर , नामदेव पीजदूरकर , परमानंद जेंगठे , पंडित लोंढे , प्रशांत भंडारे , रामकृष्ण चनकापुरे , सुनील पोटे , सुरेश डांगे , संतोष मेश्राम यांनी सभेचे आयोजन करून अभिनंदनाचा ठराव घेत पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले .
ग्रामीण महिला सहसा पुढे येत नाहीत. या झाडीपट्टीतील महिलांनी पुढे आले तर मुळ झाडीबोलीला त्यामुळे व्यासपीठ उपलब्ध होईल. झाडीबोलीचा विकास, संवर्धन होईल. हा या संमेलनामागचा उद्देश आहे. झाडीपट्टीतील कविता, लोकगीते, लोकसाहित्य याचे जतन यामुळे होऊ शकते. संमेलनाच्या निमित्ताने महिला लोकगीते, लोकसाहित्य सादर करणार आहेत. दळणावरची गाणी, शेतीची कामे करतानाची गाणी अशी यामध्ये या महिला सादर करणार आहेत.
अरुण झगडकर,
अध्यक्ष, झाडीबोली साहित्य मंडळ, चंद्रपूर
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.